एक्स्प्लोर

 नांदेडच्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फडका, दीड लाख हेक्टरवरील सोयाबीन पाण्यात 

Nanded News Update : परतीच्या पावसाने नुकसाना झाल्यामुळे यंदा नांदेडमधील शेतकऱ्याला दिवाळीचा सण देखील साजरा करता आला नाही. नांदेडमधील जवळपास दीड लाख हेक्टरवरील सोयाबीन पाण्यात गेले आहे.

Nanded News Update : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि  नंतर परतीच्या पावसाच्या फटक्याने यावर्षी शेतकऱ्यांची (Farmer) दिवाळी अक्षरशः पाण्यात गेलीय. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे. नांडमधील जवळपास दीड लाख हेक्टरवरील सोयाबीनचे पिक (Soybeans Crop) पाण्यात गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

परतीच्या पावसाने नुकसाना झाल्यामुळे यंदा शेतकऱ्याला दिवाळीचा सण देखील साजरा करता आला नाही. अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्याला दिवाळ सणाचे कपडे, गोडधोड तर दूरच पण आता खाण्या पिण्याचेही वांदे होऊन बसलेत. अतिवृष्टीचे अनुदान, पीक विम्यास बँकांचा खोडा आणि परतीच्या पावसाचा तडाखा अशा सर्वच बाजूंनी शेतकरी पिचला गेलाय. परतीच्या पावसाच्या तडाख्याने पिकांसह शेतकऱ्यांच्या संसाराची मात्र  धूळधाण  झालीय.  सरकारकडून मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांना सावकारी कर्ज काढून रब्बीची पेरणी करण्याची वेळ आलीय.

नांदेड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 850 मिलिमीटर पावसाची नोंद होते. परंतु, यावर्षी 1350 ते 1400 मिलिमीटर पेक्षा पाऊस झालाय, जो दरवर्षीच्या तुलनेत 400 मिलिमीटर पेक्षा जास्त आहे. सुरुवातीला अवकाळी, नंतर अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाच्या जोरदार तडाख्याने यावर्षी सोयाबीन, उडीद, मूग, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे.

मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा पोळा गोड करू असे आश्वासन दिले होते. परंतु पोळा गेला, दसरा गेला आणि आता दिवाळीही गेली. मात्र शेतकऱ्यांच्या तोंडी मदतरुपी सरकारची साखर  पडून तोंड गोड झालं नाही. पीक विमा मिळाला नाही, अतिवृष्टी मदत काही शेतकऱ्यांना मिळालीय, पण तीही अत्यल्प आहे. दरम्यान रब्बी हंगामाला सुरुवात झाली असताना रब्बीची पेरणी कशी करावी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यां पुढे आहे. 

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा, अतिवृष्टीचे अनुदान प्राप्त होवूनही ऐन दिवाळीच्या तोंडावरही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेली पिके पाण्यात गेली असून. ऐन दिवाळीच्या तोंडावर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळी सणावर संक्रात कोसळलीय. खरीप हंगामात काहीच शिल्लक राहिले नसल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावकारी कर्ज काढून रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी पेरणीला सुरूवात केलीय. आता तरी पिक विमा, अतिवृष्टीचे अनुदान सरकारने लवकरात लवकर द्यावे यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. 

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
EPFO : पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
EPFO : पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
Pune Crime News: पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
RBI : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
Embed widget