एक्स्प्लोर

काय सांगता! नांदेड जिल्ह्यात टोमॅटोचा तुटवडा, आंध्र प्रदेशासह बंगळुरूहूनही आले टोमॅटो

Tomato Price Hike : टोमॅटो खरेदी करण्यासाठी शहरातील अनेक भागात गर्दी पाहायला मिळत आहे.

Tomato Price Hike : एकीकडे पावसाने पाठ फिरवली असताना दुसरीकडे भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले आहेत. तर राज्यात अनेक ठिकाणी टोमॅटोचे (Tomato) दर 150 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. बाजारात  टोमॅटोची आवक घटल्याने हे दर वाढले आहेत. विशेष म्हणजे नांदेड (Nanded) जिल्ह्यात तर टोमॅटोचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशासह बंगळुरूहून टोमॅटोची आवक केली जात आहे. तर टोमॅटो खरेदी करण्यासाठी शहरातील अनेक भागात गर्दी पाहायला मिळत आहे.

वाढत्या महागाईमुळे आधीच सर्वसामान्य नागरिकाचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता भाज्यांचे दर गगनाला पोहोचले असून, महागाईचा चटका जाणवत आहे. अशातच टोमॅटोच्या दराने  कहर केला असून, टोमॅटोच्या दराने शंभरी पार केली आहे. नांदेड जिल्ह्यात तर पैसे मोजून देखील टोमॅटो मिळत नसल्याचे चित्र आहे. कारण  नांदेड शहरातील नागरिकांना आंध्र प्रदेशातील 830 किलोमीटर अंतरावरील मदनपट्टी येथून टोमॅटो येत आहे. आशा परिस्थितीत ग्राहकांनाही या टोमॅटोची भुरळ पडली असून खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

खरीप हंगाम सुरू झाला असून, शेती मशागतीची कामे आटोपून शेतकऱ्यांनी शेत रिकामे केले आहेत. त्यामुळे शेतात असलेला भाजीपाला पीकेदेखील नष्ट झाली. अशात बाजारात टोमॅटोची आवक घटली असल्याने दर वाढले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून टोमॅटोचा पुरवठा देशभरात केला जातो. पण आता राज्यातच टोमॅटोचा तुटवडा जाणवत आहे. टोमॅटोची आवक घटली आहे. माल कमी येत आहे. मागणी जास्त असून आवक कमी आहे. त्यामुळे ठोक बाजारात 100  रुपये किलो, तर किरकोळ बाजारात 120 ते 140 रुपये किलो दराने टोमॅटो विकले जात आहेत. आणखी एक महिना हीच स्थिती रहील, असे व्यापारी सांगत आहेत. 

आंध्र प्रदेशासह बंगळुरूहूनही आले टोमॅटोची आवक 

यंदा पाऊस लांबल्याने टोमॅटोची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. तसेच दरम्यानच्या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला लावणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यापूर्वी दहा रुपये किलोने विकणारे टोमॅटो सध्या सर्वाधिक ठोक बाजारात 100 ते 120 रुपये किलोने विकले जात आहेत. महाराष्ट्रातील सोलापूर, आंध्रप्रदेशातील मदनपट्टीव बंगळुरू येथूनही टोमॅटो येत आहेत. त्यामुळे नांदेड शहरात देखील असाच बाहेरून टोमॅटो विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे टोमॅटो घेण्यासाठी गर्दी होत आहे. त्यात अधिकचे पैसे देखील मोजावे लागत आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या: 

Tomato Price Hike : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर तैनात, वाराणसीतील भाजी विक्रेत्याची चर्चा; व्हिडीओ शेअर करत अखिलेश यादव म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Embed widget