एक्स्प्लोर

Tomato Price Hike : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर तैनात, वाराणसीतील भाजी विक्रेत्याची चर्चा; व्हिडीओ शेअर करत अखिलेश यादव म्हणाले...

Tomato Price Hike : समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी एक व्हिडीओ शेयर किया आहे. इस व्हिडीओमध्ये टोमॅटोच्या दुकानात दोन बाऊन्सर तैनात असलेले दिसत आहेत.

Tomato Price Hike : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर (Tomato Price) गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहे. जिथे कमी दरात टोमॅटो मिळतील तिथे जाऊन खरेदी केली जात आहे. तसंच ते साठवून ठेवले जात आहे. अशाचत वाराणसीमधील (Varanasi) एका व्हिडीओ जोरदार चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी शेअर केला आहे. संबंधित व्हिडीओची चर्चा होण्याचं कारण म्हणजे, एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोच्या साठ्याच्या पहाऱ्यासाठी चक्क दोन बाऊन्सर (Bouncer) तैनात केले आहेत.

वाराणसीच्या लंका भागातील हा व्हिडीओ आहे. इथल्या एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी दोन बाऊन्सर तैनात केले आहेत. अजय फौजी असं या विक्रेत्याचं नाव असून तो समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याने टोमॅटोचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी बाऊन्सर तैनात करण्याच्या त्याच्या कल्पनेची जोरदार चर्चा सुरु आहे.  दरम्यान अजय फौजी यांनी मागील आठवड्यात सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त टोमॅटोच्या आकाराचा केक कापला आणि लोकांना टोमॅटो वाटले होते.

या अनोख्या निर्णयाबद्दल अजय फौजी म्हणाले की, "बाऊन्सर तैनात केले आहेत, कारण टोमॅटोची दरवाढ तुम्ही पाहतच आहात. टोमॅटोसाठी मारामारी आणि लूटमार होत आहे. अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. आम्ही टोमॅटो मागवले आहेत. इथे मारामारी होऊ नये म्हणून आम्ही बाऊन्सर तैनात केले आहेत." ते पुढे म्हणाले की, "टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे टोमॅटो खरेदी करताना लोकांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याच्या चर्चा माझ्या कानावर आल्या होत्या. आमच्या दुकानात आलेल्या लोकांनीही तसाच प्रयत्न केला. त्यामुळे मी ठरवलं आता बास झालं, त्यानंतर मी माझ्या दुकानात बाऊन्सर तैनात करण्याचा निर्णय घेतला."

9 ते 5 वाजेपर्यंत बाऊन्सर्सची ड्युटी 

फौजी म्हणाले की या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी त्यांच्या दुकानात साध्या कपड्यांमध्ये बाउन्सर तैनात केले होते, परंतु जेव्हा टोमॅटो खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी दरांवरुन बाचाबाची करण्याचा प्रयत्न केला तेव्हा गणवेशधारी बाऊन्सर तैनात केले. अजय फौजी सध्या 140 ते 160 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री करत आहेत. ते म्हणाले की, दुकानात तैनात असलेले दोन्ही बाऊन्सर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ड्युटीवर असतात. मात्र, त्यांना किती पगार दिला याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. 'कोणतीही एजन्सी मोफत बाऊन्सर देणार नाही,' असं त्यांनी म्हटलं.

"जोपर्यंत माझ्याकडे टोमॅटोचा साठा आहे तोपर्यंत मी माझ्या दुकानात बाऊन्सर तैनात ठेवेन," असं त्यांनी सांगितलं. बाऊन्सर तैनात केल्यानंतर ग्राहक दुकानात येतात का असं विचारलं असता फौजी म्हणाले की, 'ग्राहक दुकानात येतात, किंमत विचारतात. ते बाऊन्सर्सकडे पैसे देतात आणि त्यांच्याकडून माल घेतात. काही जण तर कुतूहलाने  बाऊन्सर्सना पाहण्यासाठी दुकानातही येतात, कारण भाजीच्या दुकानात बाऊन्सर तैनात करणं ही त्यांच्यासाठी नवीन गोष्ट आहे.

अखिलेश यादव यांचा भाजपला टोला

दरम्यान, टोमॅटोच्या वाढलेल्या दरावरुन समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव भाजपला टोला लगावला आहे. अखिलेख यादव यांनी अजय फौजी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ट्विटरवर व्हिडीओ शेअर करताना अखिलेश यादव यांनी लिहिलं आहे की, "भाजपने टोमॅटोला 'Z+' सुरक्षा द्यावी." तत्पूर्वी, 1 जुलै रोजी अखिलेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त, अजय फौजी आणि पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी टोमॅटोच्या आकाराचा केक कापला होता आणि टोमॅटोचे वाढलेले भाव लक्षात घेऊन लोकांना टोमॅटो वाटले होते.

हेही वाचा

Tomato Price In India : टोमॅटोच्या किंमतवाढीचा McDonald's ला फटका, बर्गर आणि फूड मेन्यूमधून टोमॅटो वगळण्याचा निर्णय 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget