एक्स्प्लोर

Nanded : व्यावसायिक संजय बियाणी हत्याप्रकरणातील नऊ आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

राज्यभर गाजलेल्या नांदेडच्या प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी हत्येतील नऊ आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे

 नांदेड :  नांदेड येथील प्रसिद्ध उद्योजक संजय बियाणी यांची आज काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.  या हत्येप्रकरणी  ताब्यात घेतलेल्या नऊ आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मुख्य मारेकऱ्यांची व शस्त्रांची माहिती न मिळाल्याने कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

संजय बियाणी यांच्या  हत्येने नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ माजली होती. नांदेड जिल्ह्यातील उद्योजक, क्लासेस चालक, डॉक्टर, यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर अनेक व्यावसायिक व उद्योजकांनी आपले उद्योग गुंडाळून नांदेड शहर सोडले आहे. दरम्यान संजय बियाणी यांची हत्या करून मारेकरी पळ काढण्यात यशस्वी झाले होते. त्यासाठी पोलिसांनी SIT गठीत करून SIT चे तीन पथके पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा,आंध्रप्रदेश या विविध राज्यात तपासासाठी रवाना करण्यात आली होती. परंतु दोन महिने उलटूनही पोलिसांना आरोपींचा तपास लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय घेतला जात होता. 

तर संजय बियाणी यांच्या तपासाविषयी पत्नी अनिता बियाणी आणि खासदार प्रताप पाटिल चिखलीकर यानी आक्षेप घेत सीबीआय चौकशीची मागणी केली होती.  हत्या होऊन तब्बल 55 दिवसानंतर आरोपीचा शोध लावण्यात नांदेड पोलिस यशस्वी ठरले होते. नांदेड पोलिसांनी 55 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर हरियाणा,पंजाब, नांदेड ,उत्तर प्रदेश ,तेलंगणा या राज्यातून आतापर्यंत 11 आरोपींना ताब्यात घेतले आहे.

राज्यभर गाजलेल्या नांदेडच्या प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी हत्येतील 9 आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींची दहा दिवसाची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. बियाणींच्या हत्येत वापरलेली पल्सर मोटारसायकल पोलिसांनी जप्त केलीय. कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जळालेल्या अवस्थेत ही मोटारसायकल सापडली आहे. मात्र, गुन्ह्यातील शार्पशूटर,  वापरलेले शस्त्र आणि हत्येतील मुख्य सूत्रधार असलेला खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा हा पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे  नांदेड पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत आरोपींना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. बियांणीची हत्या खंडणी आणि दहशत पसरविण्यासाठी केली होती, हे आता स्पष्ट झाले असले तरी, पाकिस्तानात लपलेला मुख्यसुत्रधार हरविंदर सिंग रिंदा याला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

कोण होते संजय बियाणी?

  • संजय बालप्रसाद बियाणी हे मूळचे नायगाव तालुक्यातील कोळंबी येथील मूळ रहिवाशी होते.
  • ग्रामीण भागातून येऊन नांदेड सारख्या शहरात स्वतः चा उद्योग उभारून एक वेगळी ओळख निर्माण केली.
  • केबल TV व्यवसाय, मेडिकल स्टोर, जमीन खरेदी विक्रीतून व्यवसायाची सुरुवात केली.
  • बियाणी डेव्हलपर्स या नावाने नांदेड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळख.
  • चार महिन्यांपूर्वी 72 गरीब माहेश्वरी समाजातील कुटुंबांना घरे वाटप केली.
  • लग्न समारंभ, धार्मिक,सामाजिक कार्यक्रम, सर्वसामान्य, गरीब, गरजवंतांना नेहमीच मदतीचा हात देणारे अशी समाजात ओळख.
  • नांदेड शहरातील राज मॉल, बियाणी हाईट्स, राज हाईट्स, राज मॉल,1,2 ,3, 4 ,5 अशी विविध व्यावसायिक व रहिवाशी इमारती त्यांच्या मालकीच्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget