Navratri 2022 Renuka Devi : श्री रेणुका देवीचं मूळपीठ माहूर गडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी, ऑनलाईन दर्शनही घेता येणार
Navratri 2022 Renuka Devi : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठापैकी नांदेड जिल्ह्यातील माहूर इथल्या श्री रेणुका देवीचं मूळपीठ म्हणजे माहूर गड इथे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
![Navratri 2022 Renuka Devi : श्री रेणुका देवीचं मूळपीठ माहूर गडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी, ऑनलाईन दर्शनही घेता येणार Navratri 2022 Renuka Devi Preparations for Navratri festival at Mahur Fort in full swing the birthplace of Shri Renuka Devi online darshan available Navratri 2022 Renuka Devi : श्री रेणुका देवीचं मूळपीठ माहूर गडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी, ऑनलाईन दर्शनही घेता येणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/18bac9f69d78cb4fe976cb4a05eba524166417703132883_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Navratri 2022 Nanded Mahur Gad Renuka Devi : आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठापैकी नांदेड जिल्ह्यातील माहूर इथल्या श्री रेणुका देवीचं मूळपीठ म्हणजे माहूर गड इथे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. श्री रेणुका देवी हे राज्यभरातील आणि परराज्यातील आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यातून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रात नऊ दिवस देशभरातील भाविक या ठिकाणी येतात, मोठा उत्सव भरतो.
माहूर येथील श्री रेणुका देवीचे मंदिर आहे. तीर्थक्षेत्र माहूर गड हे भगवान दत्तप्रभू यांची जन्मभूमी आहे. तर देवीदेवेश्वरी निद्रास्थान असल्याने माहूरगड अधिक महत्त्व आहे. या ठिकाणी अनुसया मंदिर, दत्त मंदिर, सर्वतीर्थ, वडगुंफा, वनदेव आदि पुरातन मंदिरे आहेत. नवरात्रात या ठिकाणी विद्युत रोषणाईचा झगमगाट असतो. यावर्षीही मोठ्या उत्साहात माहूर गडावर नवरात्री उत्सवाला प्रारंभ झालेला आहे.
सृष्टीला आधार देण्याआधी भगवान विष्णूंनी माहूरला सुदर्शन चक्राचा आधार दिला होता. या क्षेत्राची रचना बघून ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, अशी आख्यायिका ऐकावयास मिळते. कृतीयुगात अमली ग्राम, त्रेतायुगात सिद्तपूर, द्वापार युगात देवनगर आणि आता माहूर अशा नावांनी माहूरची ओळख आहे.
आता ऑनलाईन दर्शन
नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील श्री रेणुका देवी मंदिरात आज नवरात्र उत्सव प्रारंभ होत असून त्यानिमित्त भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. रेणुका देवीचे दर्शन ऑनलाईन देखील घेता येणार आहे. तर श्री रेणुका देवीच्या वेगवेगळ्या विधिवत पूजा, श्रुंगार, आरती हे सर्व कार्यक्रम रेणुका देवी संस्थांनच्या वेबसाईटवर पाहता येईल. याचं 24 तास थेट प्रक्षेपण असणार आहे.
माहूर येथील रेणुका मातेचे मंदिर यादवकालीन
तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजाने श्री रेणुका देवीचे मंदिर बांधले असल्याचे सांगितले जाते. मंदिर लहान असून प्रवेश दरवाजा दक्षिण मुखी आहे. तर श्री रेणुका मातेला परशुरामाची माता म्हणून ओळखले जाते.
पाच फुटांचा मुखवटा
माहूर गडावरील श्री रेणुका मातेचा मुखवटा हा पाच फुटांचा असून तांबड्या केशरी रंगाची भव्य मूर्ती गळ्यापासून वरती आहे. शेंदूर माखल्याने मातेचे तेज डोळ्यातही मावत नाही. या मूर्तीच्या भोवती सतत नंदादीप तेवत असतो. तर मातेला दररोज पुरणाचा नैवेद्य असतो.
प्रसाद म्हणून रेणुका देवीला तांबूला विडा
माहूरगडावरच श्री दत्तात्रयाचा जन्म झाला. अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्री रेणुका मातेला तांबुलाचा विडा श्रद्धेने प्रसाद म्हणून अर्पण केला जातो. नागिलीची पाने काथ, सोप आधीचे मिश्रण कुटून तांबूला तयार केला जातो.
संबंधित बातम्या
Ekvira Devi : खान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीची पार्वतीच्या रुपात पूजा, नवरात्र उत्सवाला सुरुवात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)