एक्स्प्लोर

Sanjay Biyani: संजय बियानी यांच्यावर गोळ्या झाडणारा दीपक रांगा नांदेड पोलिसांच्या ताब्यात, 21 सप्टेंबरपर्यंत कोठडी 

Sanjay Biyani Murder Case: खंडणीच्या कारणावरुन नांदेडचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर हरविंदर सिंह रिंदा याच्या साथीदाराने गोळ्या घालून हत्या केली होती. 

नांदेड: बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांडातील प्रमुख शूटरला नांदेड पोलिसांनी पंजाब येथील कारागृहातून ताब्यात घेतले आहे. 5 एप्रिल 2022 रोजी संजय बियाणी यांच्या शारदा नगर निवासस्थानासमोर दोघांनी गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली होती. संजय बियाणी यांनी खंडणी न दिल्याने कुख्यात दहशदवादी हरविंदर सिंह उर्फ रिंदा याने त्यांची हत्या घडवल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. 

एसआयटीने या प्रकरणात नांदेड मधून एकूण 17 जणांना अटक केली आहे. गोळ्या झाडणारे दोघे फरार होते. त्यापैकी दीपक रांगा याला गेल्या जानेवारी महिन्यात एनआयने नेपाळ बॉर्डरवर अटक केली होती. त्याच्यावर पंजाब येथील मोहाली पोलीस मुख्याल्यावर ग्रेनेड हल्ला केल्याचा आरोप होता. शिवाय अनेक प्रकरणात तो पंजाब, हरियाणा, नांदेड पोलिसांना हवा होता. सध्या दीपक रांगा चंदीगड कारागृहात बंद होता. 

संजय बियाणी हत्याकांडाच्या (Sanjay Biyani Murder Case) तपासासाठी नांदेड पोलिसानी दीपक रांगा याला ताब्यात घेतले. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 21 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

घरासमोरच गोळ्या घालून हत्या 

प्रसिद्ध उद्योजक संजय बियाणी यांची 5 एप्रिल 2022  रोजी दिवसाढवळ्या त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. खंडणीच्या कारणावरुन हरविंदर सिंह रिंदा याच्या साथीदाराने त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बियाणींच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तर दुसरीकडे रिंदाच्या दहशतीमुळे नांदेड शहरातील अनेक मोठे व्यावसायिक, व्यापारी यांनी स्थलांतराची तयारी केली होती. 

संजय बियाणी यांच्यावर हरविंदर सिंह रिंदा याच्या सांगण्यावरुन गोळीबार करण्यात आला होता. गोळीबार करणाऱ्या दोन शूटरपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर दुसरा महत्त्वाचा शूटर दीपक सुरेश रांगा फरार झाला होता. त्याच्या शोध घेण्यासाठी नांदेड पोलिसांनी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. मात्र अनेक राज्यात शोध घेऊन दीपक पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र बुधवारी (25 जानेवारी) एनआयएच्या पथकाने नेपाळ बॉर्डरवरुन त्याला अटक केली आहे.

आरोपी दीपक रांगावर विविध राज्यांमध्ये 25 गुन्हे

एनआयएने पकडलेल्या दीपक सुरेश रांगा या आरोपीच्या विरोधात देशभरातील विविध राज्यांमध्ये 25 गुन्हे दाखल आहेत. त्यात हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांचा समावेश असून आता महाराष्ट्रातही गुन्हा नोंद झाला आहे. रांगा याने पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या हेडक्वॉर्टरवर रॉकेट हल्ला केला होता.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget