Nanded News : नवसाला पावणारा नांदेड जिल्ह्यातील सत्यगणपती
नवसाला पावणारा आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून सत्यगणपतीची ख्याती राज्यभर आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक येथे हजेरी लावतात.
नांदेड : भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणून नांदेडच्या सत्यगणपतीची (Satya Ganpati Nanded) राज्यभरात ख्याती आहे. महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा परराज्यांतूनही भाविक मोठ्या प्रमाणात येथे दर्शनासाठी येतात. वड, पिंपळ, निंब या तीन एकत्रित झाडात वसलेला आणि नवसाला पावणारा म्हणून सत्यगणपती अशी त्याची ख्याती आहे.
नांदेड जिल्ह्यातील दाभड येथील नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्यगणपती येथे गणेश उत्सवात (Ganesh utsav 2022) भक्तांची रीघ लागते. नवसाला पावणारा आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून सत्यगणपतीची ख्याती राज्यभर आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक येथे उत्सव कालावधीत लावतात हजेरी लावतात.
नागपूर (Nagpur) या राष्ट्रीय महामार्गावर व नांदेड शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दाभड येथील सत्यगणपती हे मराठवाड्यातील (Marathwada) जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. नांदेड तालुक्यातील दाभड येथील रहिवाशी असणाऱ्या शेतकरी भुजंग टेकाळे यांच्या शेतातील वड, पिंपळ, निंब या एकत्रित असणाऱ्या तीन झाडात बाप्पा वर्षानुवर्षे विराजमान आहेत. जवळपास तीनशे ते चारशे वर्षापूर्वी हेमाडपंथी शैलीतील मंदिर अवशेषात बाप्पाची ही स्वयंभू मूर्ती विराजमान होती. त्यानंतर 1994 या मंदिराचा जीर्णोद्धार करून या मूर्तीची पुनर्स्थापना करून मंदिर बांधण्यात आले आहे.
पूर्वमुखी मूर्ती असणाऱ्या या जागृत देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक दर महिन्याच्या चतुर्थीला, गणेश जयंती, अंगरकी चतुर्थीला शेकडो भाविक पायी चालत दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून सत्यगणपती असे नाव रूढ झाले. त्यामुळे महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या परराज्यातील भाविकही मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. पहाटेपासून ते रात्री उशीरापर्यंत सत्य गणपतीच्या दर्शनासाठी रांगा लावतात. अनवाणी पायाने भावीक पायी येऊन दर्शन घेतात.