Nanded Crime : 25 दिवसांच्या बाळाला गळा आवळून नदीत फेकलं, नांदेडमधील संतापजनक प्रकार
Nanded : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या 25 दिवसांच्या स्त्री जातीच्या बाळाचा गळा आवळून खून करून नदीत फेकून देण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. ही धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात उघडकीस आली.
Nanded Crime : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या 25 दिवसांच्या स्त्री जातीच्या बाळाचा गळा आवळून खून करून नदीत फेकून देण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. ही धक्कादायक घटना नांदेड (Nande) जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं आहे.
महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी झाले होते निधन देगलूर तालुक्यातील एका महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. गावातीलच एका दुसऱ्या पुरुषासोबत तिचे सूत जुळाले. या संबंधातून तिला मुलगी झाली. या मुलीच्या कारणावरून आरोपी शेषराव भुरे याच्या घरचे भांडण करत होते. त्यातून शेषराव भुरे याने मुलीचा गळा आवळून खून केला. त्यांनतर मुलीचे 25 दिवसांचे अर्भक एका पिशवीत टाकून नदीत फेकून दिले. याबाबत माहिती मिळाल्यावर अर्भक बाहेर काढण्यात आले. आरोपी महिला आणि शेषराव भुरे दोघांना देगलुर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, पुण्यात काही दिवसांपूर्वी गर्भपात करताना तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रियकराने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. आपल्या आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे तिच्या चिमुकल्यांना लक्षात आले. त्यानंतर प्रियकराने प्रेयसीच्या दोन चिमुकल्यांना निर्दयीपणे इंद्रायणी नदी पात्रात फेकून दिले होते. यामध्ये आईचा गर्भपातामुळे मृत्यू झालाच पण प्रियकराने तिच्या दोन चिमुकल्यांचाही जीव घेतलाय.
दया मया दाखवली नाही, चिमुकल्यांना इंद्रायणीत फेकून दिलं
गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी 6 जुलै रोजी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. गर्भवती प्रेयसीला आणि तिच्या 5 आणि 2 वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखैर कळंबोली 6 जुलै रोजी येथे गेला. अमर रुग्णालयात प्रेयसीचा गर्भपात करण्यात आला, मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं प्रेयसीचा 8 जुलै रोजी मृत्यू झाला. त्यानंतर गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गाईकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये आणला आणि गजेंद्र आणि रविकांतने 9 जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला. नंतर प्रेयसीची दोन्ही मुलं रडू लागली. आता या दोघांमुळं आपलं बिंग फुटेल, या भीतीने निर्दयीपणाचा कळस गाठला. कोणतीही दया-मया न दाखवता त्या दोन्ही मुलांना ही त्याच नदीच्या प्रवाहात जीवंत फेकून दिलं.
इतर महत्वाच्या बातम्या