Amritpal Singh : अमृतपालच्या शोधात नांदेड पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन; समर्थकांची झाडाझडती
Amritpal Singh Arrest Operation: नांदेड पोलिसांकडून रात्री शहरातील काही भागात अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवून घरांची झाडाझडती घेण्यात आली आहे.
Amritpal Singh Arrest Operation: वारीस दे पंजाब या खलिस्तान समर्थक संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगचा (Amritpal Singh) शोध अजूनही सुरू आहे. आठ दिवस उलटून गेले तरी अमृतपाल सुरक्षा यंत्रणांना सापडत नाही. तर पंजाबसह देशभरातील वेगेवेगळ्या राज्यातील पोलिसांसह राष्ट्रीय तपास यंत्रणाही त्याचा शोध घेत आहे. दरम्यान नांदेड शहरात (Nanded City) देखील अमृतपाल सिंगचे समर्थक असल्याने स्थानिक पोलीस अलर्ट झाली आहे. नांदेड पोलिसांकडून रात्री शहरातील काही भागात अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवून घरांची झाडाझडती घेण्यात आली आहे. तसेच नांदेड पोलीस लक्ष ठेवून आहे.
खलिस्तानवादी अमृतपाल सिंगला पंजाब पोलिसांनी फरार घोषित केले आहे. त्यामुळे त्याचा सर्वत्र शोध घेतला जात आहे. तर तो पंजाबमधून फरार झाला असल्याचे समोर आले आहे. नांदेड शहरात देखील वारीस दे पंजाब या संघटनेचे अनेक सदस्य आहेत. तसेच काही तरुण भिंद्रानवालेचेचे छायाचित्र आपल्या सोशल मीडियाच्या स्टेट्सवर ठेवतात. त्यामुळे अशा परिस्थितीत अमृतपाल नांदेडात येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. त्यामुळे नांदेड पोलीस अलर्ट झाली असून, पोलिसांनी शनिवारी रात्री शहरातील काही भागात कोम्बिंग ऑपरेशन राबविले आहे. यावेळी अनेकांची कसून चौकशी देखील करण्यात आली. विशेष म्हणजे नांदेड शहरात सोशल मीडियाद्वारे सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांच्या सायबर सेलकडून सोशल मीडियावर वॉच ठेवण्यात येत आहे.
कोण आहे अमृतपाल सिंह?
अमृतपाल सिंग वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख असून, त्याचा जन्म 1993 मध्ये अमृतसर जिल्ह्यातील जल्लूपूर खेडा गावात झाला. तर अमृतपाल तरसेम सिंह यांचा तो मुलगा आहे. अमृतपाल 2012 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी पंजाबहून दुबईला नोकरीसाठी गेला होता. तो 10 वर्षे म्हणजे 2022 पर्यंत दुबईत वास्तव्यास होता. दुबईत त्याच्या काकांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. शेतकरी आंदोलनादरम्यान अमृतपाल दीप सिद्धूसोबत दिल्ली सीमेवर आला. त्याने सप्टेंबर 2022 मध्ये पुन्हा केस ठेवून दस्तरबंदी केली आणि मोगाच्या रोडे गावात दस्तरबंदीचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर तो दीप सिद्धूच्या 'वारिस पंजाब दे' या संघटनेचा प्रमुख बनला. अमृतपालने पंजाबमध्ये धार्मिक यात्राही सुरू केली. खलिस्तानी चळवळीत ग्रामीण तरुणांना सामील करण्यास सुरुवात केली असल्याचं बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :