Nanded News: धक्कादायक! मुख्याध्यापकाने केला 29 वर्षीय महिलेवर बलात्कार, नांदेड जिल्ह्यातील धक्कादायक घटना
Nanded Crime News: याप्रकरणी मरखेल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यात (Nanded District) शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. एका मुख्याध्यापकाने (Principal) शेतात एकटी असल्याची संधी साधून 29 वर्षीय विवाहित बलात्कार (Rape) केला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी मरखेल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाधर पांढरे असे या आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महिलेवर मुख्याध्यापक असलेल्या व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात समोर आली आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास शिळवणी शिवारात घडली आहे. शिळवणी येथील 29 वर्षीय विवाहित महिला ही गावातील नागेंद्र हडोळे यांच्या शेतात रविवारी तुरीचा सरवा वेचण्यासाठी सकाळी दहाच्या सुमारास गेली होती. दरम्यान, दुपारी एकच्या सुमारास व्यंकटराव देशमुख विद्यालयात मुख्याध्यापक असलेला गंगाधर पांढरे याने शेतात येऊन महिलेशी अश्लील चाळे करत झटापट केली.
बळजबरीने केला बलात्कार...
मुख्याध्यापक असलेला गंगाधर पांढरे याने महिलेला जबरदस्तीने ओढत धुऱ्यावरील लिंबाच्या झाडाच्या आडोशाला नेऊन बलात्कार केला. या मुख्याध्यापकाने स्वतःसोबत या महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, महिलेवर झालेल्या अत्याचारानंतर परिसरासह देगलूर तालुक्यात खळबळ उडाली असून, याप्रकरणी मरखेल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बलात्काराच्या घटनेमुळे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे तपास करीत आहेत.
शिक्षण क्षेत्रात खळबळ!
नांदेड जिल्ह्यातील 29 वर्षीय महिलेवर चक्क एका मुख्याध्यापकाने बलात्कार केल्याने शिक्षक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आरोपी गंगाधर पांढरे हा मुख्याध्यापक असून, त्याने अशाप्रकारे कृत्य केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान याप्रकरणी आरोपी गंगाधर पांढरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बलात्काराच्या आरोपीची शाळेत धडे...
दरम्यान नांदेड जिल्ह्यातील काही जिल्हा परिषदेच्या शाळेत चक्क बलात्काराचे आरोप असलेल्या आसाराम बापूचे धडे दिले जात असल्याचा प्रकार समोर आल्याने शिक्षण क्षेतात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे आसाराम बापूचे अनेक कार्यक्रम देखील शाळेत भरवण्यात आल्याचे देखील समोर आले आहे. मात्र याबाबत शिक्षक अधिकाऱ्यांनी नेमकं प्रकरण माहित नसल्याचे सांगत हात वरती केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: