एक्स्प्लोर

Nanded: एक रुपयाच्या बिडीने अख्खं कुटुंब संपवलं; नांदेड जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

Aurangabad: फवारणी करणाऱ्या टाकीत असलेल्या पेट्रोलचा भडका उडून घरातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

Nanded News: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील बल्लूर या गावात एक दुर्दैवी घटन समोर आली आहे. एक रुपयाच्या बिडीने अख्खं कुटुंब संपवलं आहे. बिडी पिऊन झाल्यावर ती घरातील फवारणी करणाऱ्या टाकीवर फेकल्याने आतमध्ये असलेल्या पेट्रोलचा भडका उडून घरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत सूर्यकांत माधवराव सक्रप्पा (वय 52 वर्षे), गुबाई सूर्यकांत सक्रप्पा (वय50 वर्षे) आणि मुलगा कपिल सूर्यकांत सक्रप्पा (वय 20 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सूर्यकांत सक्रप्पा हे आपल्या पत्नी आणि मुलासह बल्लूर गावात वास्तव्यास होते. तर शेतीची कामे सुरु असल्याने पिकांवर फवारणी करण्यासाठी त्यांनी फवारणी टॅंक आणली होती. त्यासाठी त्यात पेट्रोल सुद्धा भरून ठेवेले होते.  दरम्यान 7 ऑगस्ट रोजी सूर्यकांत सक्रप्पा आणि त्यांची पत्नी व मुलगा नेहमीप्रमाणे घरात बसले होते. सूर्यकांत यांना बिडी पिण्याची सवय असल्याने त्यांनी बिडी पेटवली. त्यांनतर बिडी संपणार असल्याने पेटती बिडी घराबाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. 

अख्खं कुटुंब संपवलं

मात्र बिडी घरात असलेल्या फवारणी टॅंकमध्ये जाऊन पडली. टॅंकमध्ये पेट्रोल असल्याने जोराचा भडका झाला. पाहता-पाहता मोठा स्फोट झाला आणि सूर्यकांत यांच्यासह पत्नी गुबाई आणि मुलगा कपिल यांच्यावर आगीचा भडका जाऊन पडला. आग एवढी भयंकर होती की यात तिघेही गंभीर भाजले गेले. देगलूरच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना विष्णुपुरी नांदेड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना अखेर आज तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे एक रुपयाच्या बिडीने अख्खं कुटुंब उध्वस्त केले आहे. 

गावात हळहळ...

या दुर्देवी घटनेत सूर्यकांत यांचे संपूर्ण कुटुंब संपले आहे. एका छोट्याशा चुकीने त्यांना पत्नी आणि मुलासह स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. या घटनेने गावावर शोकाकाळ पसरली असून, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सक्रप्पा कुटुंबासोबत घडलेल्या या घटनेनंतर गावातील अनेकांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. 

गेल्या तीन दिवसांपासून डॉक्टरांचे प्रयत्न, पण...

सूर्यकांत यांनी पेट्रोल असलेल्या फवारणी पंपाच्या कॅनमध्ये पेटती बिडी फेकल्याने स्फोट होऊन तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना आधी देगलूरच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना विष्णुपुरी नांदेड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेली तीन दिवस त्यांच्यावर उपचार करत त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्यतीचे प्रयत्न सुरु होते. मात्र अखेर ते अपयशी ठरले आणि आज तिघांचा मृत्यू झाला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai BMC Budget 2025:  पालिकेची तिजोरी भरण्यासाठी मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार, बजेटमध्ये कचरा संकलन शुल्काच्या घोषणेची शक्यता
मुंबईकरांना नवा भुर्दंड, कचरा संकलन शुल्क लागणार? महापालिकेच्या बजेटमध्ये घोषणेची शक्यता
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या घरासाठी बुकिंग शुल्क भरलेल्या प्रत्येकाला घर मिळणार? 26 हजार घरांसाठी किती अर्ज, आकडेवारी समोर
सिडकोकडून मसुदा यादी प्रकाशित, बुकिंग शुल्क भरलेल्या प्रत्येकाला घर मिळणार? मोठं कारण समोर
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 04 February 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMumbai Women Safety : मुंबईत महिला सुरक्षा वाऱ्यावर?पैशाचा तगादा लावल्यानं तरुणानं महिलेला संपवलं?ABP Majha Headlines : 11 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSantosh Deshmukh Beed : संतोष देशमुख हत्येचं प्रकरण, जातीयवादाचं वळण Rajkiya Sholey Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai BMC Budget 2025:  पालिकेची तिजोरी भरण्यासाठी मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार, बजेटमध्ये कचरा संकलन शुल्काच्या घोषणेची शक्यता
मुंबईकरांना नवा भुर्दंड, कचरा संकलन शुल्क लागणार? महापालिकेच्या बजेटमध्ये घोषणेची शक्यता
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या घरासाठी बुकिंग शुल्क भरलेल्या प्रत्येकाला घर मिळणार? 26 हजार घरांसाठी किती अर्ज, आकडेवारी समोर
सिडकोकडून मसुदा यादी प्रकाशित, बुकिंग शुल्क भरलेल्या प्रत्येकाला घर मिळणार? मोठं कारण समोर
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
Embed widget