Nanded News : धक्कादायक! भावांनी आणि जन्मदात्या वडिलांनी मुलीला संपवलं, नांदेडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना
Nanded News : भावांनी आणि जन्मदात्या वडिलांनीच मुलीला संपवल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये (Nanded) घडली आहे.
![Nanded News : धक्कादायक! भावांनी आणि जन्मदात्या वडिलांनी मुलीला संपवलं, नांदेडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना Maharashtra Nanded News Parents killed Girl in Nanded Nanded News : धक्कादायक! भावांनी आणि जन्मदात्या वडिलांनी मुलीला संपवलं, नांदेडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/27/901896eda126cf9b6404cc06a47fa35c1674796470677339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nanded News : भावांनी आणि जन्मदात्या वडिलांनीच मुलीला संपवल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये (Nanded) घडली आहे. मुलीची हत्या करुन राख उधळून दिल्याची माहिती समोर आली आहे. मैत्रिणीने राज्य महिला आयोगाकडे (Maharashtra state women commission chairman) तक्रार केल्यानं या हत्येची घटना उघडकीस आली आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील महीपाल पिंपरी इथं ही घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.
पाच जणांवर गुन्हा दाखल
शुभांगी जोगदंड असे हत्या झालेल्या मुलीच नाव आहे. ती नांदेड इथं BAMS तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत होती. ही घटना रविवारी घडली आहे. आत्याच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याने वडीलासह भावांनी मिळून मुलीस क्रुरपणे मारहाण करुन हत्या केली. तसेच तिला जाळून तिची राख उधळून लावल्याची माहिती समोर आली आहे. तर मुलाचे अपहरण केल्याची माहिती देखील मिळत आहे. या घटनेमुळं महिपाल पिंपरी गाव दहशतीत आहे. या घटनेप्रकरणी रात्री उशीरा पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 302 या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. प्रतिष्ठेपोटी आई वडिलांनी मुलीला जीवे मारल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत मुलीचे वडील भाऊ ,मामा, दोन चुलतभाऊ अशा पाच लोकांचा समावेश आहे.
नात्याला काळीमा फासणारी घटना
नात्याला काळीमा फासणारी घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. ही घटना रविवारी घडली आहे. अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. मुलीची तिचे आई-वडील, भाऊ यांनी हत्या केली. नात्यातील मुलाशी प्रेमसंबध असल्यामुळं ही हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी काल रात्री उशीरा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. मैत्रीणीनं राज्य महिला आयोगाकडं तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
हत्येनंतर चार दिवसांनी गुन्हा दाखल
महीपाल पिंपरी गावचे पोलीस पाटील आणि उपसरपंच यांनी दिलेल्या माहिती नुसार शुभांगी जोगदंड हिची मध्यरात्री घरातच तिच्या कुटुंबीयांनी हत्या केली. या घटनेची माहिती गावास लागू नये, यासाठी तिचा मृतदेह शेतातील चिकूच्या बागेत जाळून, अस्थी विहरित टाकल्या आणि मृदेहाची विल्हेवाट लावली. पण गावातील होणारी चर्चा, मैत्रीण तसेच पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल चार दिवसांनी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडे तरुणीच्या मैत्रिणीने तक्रार केल्याचे पोलिसांनी नाकारले आहे. अशा प्रकारे राज्य महिला आयोगाकडे कोणीही तक्रार केली नसल्याचे पोलिसांनी सांगितलंय.
महत्त्वाच्या बातम्या:
Bhandara Crime : भंडाऱ्यात दारूच्या नशेत भाच्याने केली मामाची हत्या, दोघेही विट भट्टीवर होते कामाला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)