एक्स्प्लोर

अशोक चव्हाणांकडून अपेक्षाभंग म्हणून काँग्रेसमध्ये परत; मेहुणे अन् माजी खासदार खतगावकरांची घोषणा

Bhaskarrao Khatgaonkar : अशोक चव्हाण भाजपमध्ये जातात त्यांचे मेहुणे भास्करराव खतगावकर हे भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. 

नांदेड : भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांच्या सून मिनल खतगावकर यांचा काँग्रेस पक्षातील प्रवेश निश्चित झाला आहे. काँग्रेस प्रवेशाबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांच्या गटाच्या वतीने बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे कार्यकर्त्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मीनल खतगावकर नायगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून लढण्याचा ठराव एकमताने पारित झाला. 

भास्करराव खतगावकर म्हणाले की,  "नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर आपल्याला भाजपकडून प्रस्ताव आला होता. मीनल खतगावकर यांनी नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढवावं असा भाजपाचा प्रस्ताव होता. पण मी हात जोडून नकार दिला. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँगेसकडून दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा ठराव पारीत केला. काँग्रेसच्या वरिष्ठांकडून आम्हाला निरोप आला की नायगावमधून मीनल खतगावकर यांना उभं करा." दरम्यान, भास्करराव खतगावकर हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होत्या. आता त्यांच्या प्रवेशाची निश्चिती झाली आहे. 

अशोक चव्हाण यांच्याकडून अपेक्षा भंग - खतगांवकर

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आपल्या सूनबाईला आमदार बनवण्यासाठी खतगावकर यांनी हा निर्णय घेतलाय, असे स्वतःच त्यांनी जाहीर केलंय. मात्र, याबाबत एबीपी माझाशी बोलताना खतगांवकर म्हणाले की, विकासाबाबतीत अशोकरावांकडून अपेक्षा होत्या, त्या पूर्ण होऊ शकत नसल्याने आपण काँग्रेसमध्ये जात असल्याचा दावा केलाय.  काँगेस प्रवेशाबाबत निर्णय घेण्यासाठी आज बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत खतगावकर यांनी हा निर्णय जाहीर केला. नायगाव मधून मीनल खतगावकर यांना उभं करा असा काँग्रेसच्या वरिष्ठांकडून निरोप आल्याचे खतगावकर म्हणाले. भाजपने तीन वेळा उमेदवारी डावलली त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे खतगावकर म्हणाले. त्यांच्या सून मीनल खतगावकर यांना काँग्रेसकडून नायगाव मतदार संघातून उमेदवारी दिली जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 

ही बातमी वाचा : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलनBuldhana CM Eknath Shinde Welcome : बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दीAmaravati Textiles Park :उद्या अमरावती टेक्सटाईल पार्कचं भूमिपूजन, मोदींच्या हस्ते उद्या ई-भूमिपूजनRatnagiri Khed Case : स्वप्नातील गोष्ट खरी ठरली कोकणातल्या खेडमधील प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Embed widget