(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashok Chavan :अशोक चव्हाणांचा राजकीय वारस कोण? भारत जोडो यात्रेत चर्चेला उधाण
Ashok Chavhan : श्रीजया चव्हाण यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. अलिकडेच पोस्टरवरही त्यांचा फोटो दिसू लागलाय. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेतील त्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला.
Ashok Chavan : अशोक चव्हाण ( Ashok Chavan) भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा एकीकडे सुरु असताना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रा दाखल झालीय. या यात्रेत अशोक चव्हाण यांची उपस्थिती तर आहेच. पण अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यादेखील काल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत यात्रेत दिसल्या. त्यानंतर भारत जोडो यात्रेपेक्षा जास्त चर्चा ही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजकीय वारस कोण ?याची जास्त चर्चा होताना दिसत आहे.
महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रात जेव्हापासून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू झाली. तेव्हापासून भारत जोडोपेक्षा जास्त चर्चा ही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजकीय वारस कोण ?याची जास्त चर्चा होताना दिसतेय. कारण भारत जोडो यात्रेतील काँग्रेसच्या जेष्ठ राजकीय नेत्यांसोबत अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण हिचे झळकलेले बॅनर... तसेच देगलूरपासून राहुल गांधींसोबत या पदयात्रेत श्रीजया चव्हाण चालत होत्या. श्रीजया चव्हाण यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. अलिकडेच पोस्टरवरही त्यांचा फोटो दिसू लागलाय. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेतील त्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला.
दरम्यान आज तिसऱ्या दुवशी सकाळी देखील श्रीजया या राहुल गांधीसोबत भारत जोडो यात्रेत चालत आहेत. त्यामुळे 10 नोव्हेंबर रोजी नांदेड येथील राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत श्रीजया यांची राजकीय भूमिका व आगमन स्पष्ट होईल याची चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे येत्या काळात एका मोठ्या राजकीय घराण्यातील आणि देशाचे माजी गृहमंत्री ,जलनायक शंकरराव चव्हाण यांची नात ही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजकीय वारस असेल हे मात्र निश्चित आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या अनपेक्षित पराभवामुळे त्यांच्या समर्थकांसह चव्हाण परिवाराला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अशोकरावांच्या निवडणुकीत दोन्ही मुलींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तीन वर्षांत चव्हाण यांची जनसंपर्क यंत्रणा श्रीजयाने पडद्यामागून लीलया सांभाळली. तसेच अनेक सार्वजनिक कार्यक्रमांच्या नियोजनात भूमिका पार पाडलीय.
संबंधित बातम्या :
Nanded :आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांची कन्या राजकारणात? भारत जोडो यात्रेतून करणार राजकीय पदार्पण