Ashok Chavan: वंचित आघाडीला सोबत घ्यावं अशी माझी इच्छा : अशोक चव्हाण
दोन पक्षाचे सरकार होते. तेव्हा 26-22 अशा जागा होत्या. जिंकण्याची परिस्थिती ज्याची आहे तो विचार करून जागा लढवल्या पाहिजे, वंचितला सोबत घ्यावे अशी माझी इच्छा आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.
नांदेड : निवडणुकांसाठी (Lok Sabha Election) प्रत्येक पक्ष जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवू लागलाय. तसंच काँग्रेसच्याही (Congress) जागा वाटपासाठी दिल्लीत बैठक झाल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सांगितलंय. आमच्याकडून पक्षश्रेष्ठींनी माहिती घेतली, चर्चा करून जो निर्णय येईल त्यानंतर चर्चा सुरू होईल असंही चव्हाण म्हणालेत. तसंच वंचितला सोबत घ्यावं अशी माझी इच्छा असल्याचं अशोक चव्हाणांनी 'माझा' शी बोलताना सांगितलंय. ते नांदेडमध्ये बोलत होते.
अशोक चव्हाण म्हणाले, जागा वाटपसंदर्भात दिल्लीमध्ये बैठक झाली, आमच्याकडून पक्षश्रेष्ठींनी माहिती घेतली. चर्चा करून जो निर्णय येईल त्या नंतर चर्चा सुरू होईल . सगळ्यांना जास्त जागा पाहिजे. अगोदर दोन पक्षाचे सरकार होते. तेव्हा 26-22 अशा जागा होत्या. जिंकण्याची परिस्थिती ज्याची आहे तो विचार करून जागा लढवल्या पाहिजे, वंचितला सोबत घ्यावे अशी माझी इच्छा आहे.
महाराष्ट्रामध्ये जास्त प्रकल्प आले पाहिजे : अशोक चव्हाण
सिंधुदुर्ग किनाऱ्यावर (Sindhudurg) होणारा पाणबुडी प्रकल्प (Submarine Project) गुजरातला जाणार यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, सत्ताधारी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री आहे. त्यांनी विचार केला पाहिजे. गुजरातला अधिक प्रकल्प चालले आहे. महाराष्ट्रामध्ये जास्त प्रकल्प आले पाहिजे.
कोण कोणाशी आघाडी करते त्याच आम्हाला काही घेणं देणे नाही : अशोक चव्हाण
सध्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि राज ठाकरे युती करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे . याबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, कोण कोणाशी आघाडी करते त्याच आम्हाला काही घेणं देणे नाही.
अशोक चव्हाणांची टीका
वंचित आघाडीला सोबत घ्यावे असा आपला विचार असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला जात असल्या बाबत त्यांनी टीका केलीय तसेच भाजपच्या स्थानिक खासदाराला आपलं काय होईल अशी भीती असल्याने ते माझ्या बाबतीत अफवा पसरवत असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.
जातिनिहाय जनगणना ही काँगेसची जाहीर मागणी : अशोक चव्हाण
मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.. त्यांचा मागणीला माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी पाठिंबा दिला आहे. जातीनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची जाहीर मागणी आहे. काय परिस्तिथी आहे ते देशासमोर येईल, असे अशोक चव्हाण म्हणाले.
हे ही वाचा :