एक्स्प्लोर

Nagpur News: नागपूर रेल्वे स्थानकातील अंडा बिर्याणी महागात पडली, यशवंतपूर एक्सप्रेसमधील 40 प्रवाशांना एकापाठोपाठ उलट्या, प्रचंड घबराट

Indian Railway Food: २२५३४ यशवंतपूर-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी हा प्रकार घडल्यानंतर रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली. अंडा बिर्याणी खाल्ल्यानंतर तीन-चार तासांनी प्रवाशांना उलट्यांचा त्रास सुरु झाला.

नागपूर: भारतीय रेल्वेतील खानपानाची सेवा आणि अन्नाचा दर्जा हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांविषयीचे अनेक नकारात्मक किस्से आपण आजपर्यंत ऐकले असतील. यामध्ये आता आणखी एका किस्स्याची भर पडली आहे. रेल्वेच्या स्टॉलवरील (Railway Stall) बिर्याणी खाल्ल्यामुळे यशवंतपूर एक्स्प्रेसमधील (Yesvantpur Express) 40 प्रवाशांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यशवंतपूरवरून निघालेली ही गाडी गोरखपूरकडे जात असताना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील बल्लारशा स्थानकावरील जनआहारमधून या गाडीत अंडा बिर्याणीचे जवळपास दोनशे पार्सल पाठविण्यात आले. तसेच नागपूरच्या जनआहार स्टॉलवरुनही काही पार्सल या ट्रेनमध्ये पाठवण्यात आले होते. ट्रेन सुरु झाल्यानंतर प्रवाशांनी ही बिर्याणी खाल्ली. यशवंतपूर एक्स्प्रेसने इटारसी स्थानक सोडून गोरखपूरच्या दिशेने प्रवास सुरु केल्यानंतर अंडा बिर्याणी खाल्लेल्या प्रवाशांना त्रास जाणवायला लागला. ट्रेनमधील जवळपास 40 जणांना उलट्यांचा त्रास सुरु झाला. काही प्रवाशांना मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरु झाला. हे सर्व प्रवाशी वेगवेगळ्या डब्यात होते. त्यामुळे सुरुवातीला कोणाला या घटनेचे गांभीर्य कळाले नाही. मात्र, संपूर्ण ट्रेनमधील प्रवाशी उलट्या करत आहेत हे कळाल्यानंतर त्यामुळे काही काळासाठी घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. 

या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून तातडीने हालचाली करण्यात आल्या. त्यामुळे कानपूर रेल्वे स्थानकात डॉक्टरांचे एक पथक यशवंतपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढले. या डॉक्टरांच्या पथकाने तातडीने सर्वजणांवर उपचार केले. त्यानंतर सर्वांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. आता या सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर आहे.

नागपूर आणि बल्लारशा स्थानकातील जनआहार स्टॉल बंद

रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे. नागपूर तसेच बल्लारशा स्थानकावरील जनआहारमधील सर्व खाद्यपदार्थांची विक्री तातडीने थांबविण्यात आली आहे. या दोन्ही स्टॉलवरील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून पुढील पावले उचलली जातील.

आणखी वाचा

चंद्रपूरमध्ये महाप्रसादातून 100 जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
Embed widget