Chandrapur : चंद्रपूरमध्ये महाप्रसादातून 100 जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू
Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात महाप्रसादतून 100 जणांना विषबाधा झाली आहे. भद्रावती (Bhadravati) तालुक्यातल्या माजरी गावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर मंदिरात भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
![Chandrapur : चंद्रपूरमध्ये महाप्रसादातून 100 जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू Chandrapur 100 people food poisoned by Mahaprasad in Chandrapur, one died Marathi News Chandrapur : चंद्रपूरमध्ये महाप्रसादातून 100 जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/14/2bc6598147cc8f454faf17bd1e7b3ad31713089190435924_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात महाप्रसादतून 100 जणांना विषबाधा झाली आहे. भद्रावती (Bhadravati) तालुक्यातल्या माजरी गावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर मंदिरात भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, महाप्रसाद घेतल्यानंतर जवळपास 100 जणांना त्रास सुरु झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. रामप्रेक्ष यादव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत्यू झालेला व्यक्ती वृद्ध असल्याची माहिती आहे. अनेकांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आरोग्य यंत्रणाही कामाला लागली आहे.
पोलीस व आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून
अधिकची माहिती अशी की, चंद्रपूर जिल्ह्यात महाप्रसादातून 100 नागरिकांना विषबाधा झाली. यामध्ये एका वृद्धाचा मत्यू झालाय. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हा मृत्यू नोंदविला गेलाय. भोजनानंतर सहभागी 100 लोकांना रात्री उशिरा मळमळ-उलटीचा त्रास झाल्यानंतर आसपासच्या वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड रुग्णालय, वरोरा उपजिल्हा रुग्णालय, स्थानिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी भेट दिली आहे. सध्या पोलीस व आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
रात्री उशीरा उलट्यांचा त्रास
एका धार्मिक कार्यक्रमानंतरच्या महाप्रसादातून 100 नागरिकांना विषबाधा झाली. भद्रावती तालुक्यातल्या माजरी गावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर मंदिरात भोजनाचे केले होते. त्या वृद्ध व्यक्ती रामप्रेक्ष यादव (80) यांचा मृत्यू झालय. आयोजन, भोजनानंतर सहभागी 150 लोकांना रात्री उशिरा मळमळ-उलटीचा त्रास सुरु झाला. त्यानंतर अनेकांना आसपासच्या स्थानिक रुग्णालयात करण्यात आले. सध्या पोलीस व आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर ठेवून आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)