Womens Day 2022 : RTO कडून पहिलाच प्रयोग, महाराष्ट्रात सावित्री पथकाची स्थापना
Womens Day 2022 : आज जागतिक महिला दिन, परिवहन विभागाकडून महाराष्ट्रातल्या पहिल्या सावित्री पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
Womens Day 2022 : आज जागतिक महिला दिन, (International Womens Day) परिवहन विभागाकडून (RTO) महाराष्ट्रातल्या पहिल्या सावित्री पथकाची (Savitri Squad) स्थापना करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनापासून राज्यातील महिला परिवहन अधिकाऱ्यांचे प्रथम सावित्री पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. महिला वाहनचालकांची संख्या वाढल्यामुळे या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी हा नाविन्यपूर्ण प्रयत्न नागपूर परिवहन विभागाकडून करण्यात आला आहे. हे पथक शहरातील शाळा, महाविद्यालय, महामार्ग येथे प्रत्यक्षात जाऊन महिलांमध्ये वाहतुकीबाबत जनजागृती करणार आहेत,.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
देशात सर्वत्र महिला सशक्तीकरण आणि सबलीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून यासाठी विविध योजना व उपक्रम राबविले जात आहेत. सावित्री पथक हे महामार्गावर वाहतूक नियम मोडणाऱ्यावर कारवाईसह नवीन वाहतूक नियम तसेच शिक्षण-प्रशिक्षण जनजागृतीचे काम करणार आहे, परिवहन विभागाकडून महाराष्ट्रातल्या पहिल्या सावित्री पथकाची स्थापना करण्यात आली आहे. आजच्या महिला दिनापासून राज्यातील परिवहन अधिकाऱ्यांचे हे पहिले पथक कार्यान्वित झाले आहे. नागपूरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या महिला अधिकाऱ्यांचे हे पथक महामार्गांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. शिवाय वाहतूक नियमांचे शिक्षण देत जनजागृतीही करणार आहे.
नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम
सध्या दुचाकी आणि चारचाकी चालवणाऱ्या महिलांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामुळे वाहन चालवणाऱ्या महिलांना नव्या वाहतूक नियमांची जाणीव करून देत त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेण्यात सावित्री पथकाचे प्राधान्य राहणार आहे. शिवाय हे सावित्री पथक महाविद्यालय निवासी संकुल आणि इतर सार्वजनिक ठिकाणी जाऊन वाहतूक नियम आणि संदर्भात जनजागृती करण्याचा काम आहे करणार आहे. परिवहन विभागातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत त्यांना प्रत्यक्ष महामार्गावर उतरवून त्यांच्या हातात कामाची सर्व सूत्र सोपवण्याचा नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Womens Day Google Doodle : महिलांना समर्पित आजचे खास गुगल डूडल, महिला दिनाच्या दिल्या शुभेच्छा
- Womens Day 2022 : महिला दिन का साजरा केला जातो? यंदाची थीम काय?
- Russia Ukraine Conflict : पोलंडमधील 'ऑपरेशन गंगा' मोहीम फत्ते, जखमी हरजोतला घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान मायदेशी परतले
- Women's Day 2022 : जागतिक महिला दिनाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha