एक्स्प्लोर

50 वर्ष सिनेसृष्टीची सेवा करणाऱ्या 92 वर्षीय सुलोचनाजींना दादासाहेब फाळके पुरस्कार का नाही? : उज्ज्वल ठेंगडी

50 वर्ष चित्रपट सृष्टीची सेवा करणाऱ्या 92 वर्षांच्या सुलोचना लाटकर यांना अद्यापही दादासाहेब फाळके पुरस्कार दिलेला नाही. यावरुन दिग्दर्शक आणि लेखक उज्ज्वल ठेंगडी यांनी सरकारसह चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना उद्विग्न सवाल विचारला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यासाठी एखाद्याची श्वास थांबण्याची वाट पाहत आहत का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

नागपूर : दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यासाठी एखाद्याची श्वास थांबण्याची वाट पाहत आहेत का असा उद्विग्न सवाल दिग्दर्शक आणि लेखक उज्ज्वल ठेंगडी यांनी उपस्थित केला आहे. शेकडो चित्रपटात उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या, 50 वर्ष चित्रपट सृष्टीची सेवा करणाऱ्या 92 वर्षांच्या सुलोचना लाटकर यांना आजवर दादासाहेब फाळके पुरस्कार का दिला नाही असा प्रश्न सरकारसह चित्रपट सृष्टीतील दिग्गजांना विचारत उज्ज्वल ठेंगडी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या या मागणीकडे लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.

मूळात 92 व्या वर्षी एखाद्याला दादासाहेब फाळके पुरस्कार देणे गुन्हा आहे. सुलोचनाताई मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकाला वंदनीय आहेत. मात्र आजवर त्यांच्या योगदानाची दखल का घेतली गेली नाही? दोन वर्षांपूर्वी सुलोचनाजी 90 वर्षांच्या झाल्या असताना सचिन तेंडुलकर, लता दीदी, आशुतोष गोवारीकर आणि खुद्द पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. तेव्हा वाटले होते की सरकार सुलोचनाजींच्या अभिनय क्षेत्रातल्या कार्याची दखल घेत आहे. मात्र, नंतर काय झाले हे कोणालाच माहित नाही. खंत वाटते की महाराष्ट्रातील कलावंतांकडे मोठा पुरस्कार देताना दुर्लक्ष केलं जाते.

दादासाहेब फाळके कुठचे आहेत? बॉलिवूड कुठे आहे? मग महाराष्ट्रातील कलावंतांकडे दुर्लक्ष का होते असा सवाल उज्ज्वल ठेंगडी यांनी उपस्थित केला आहे. जे स्थान लतादीदींचं आहे तेच स्थान चित्रपटसृष्टीतील प्रत्येकाच्या मनात सुलोचनाजी यांच्याबद्दलही आहे. महाराष्ट्राच्या या माऊलीचा गौरव करा अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. आज जरी मी एकटा ही मागणी करत असलो तरी उद्या माझ्या मागे लाखो कलावंतांची आवाज असेल. त्यामुळे अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, आशुतोष गोवारीकर, सचिन तेंडुलकर यां सर्वानी पंतप्रधानकडे ही मागणी उचलून धरली पाहिजे. जर यंदा अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिली ही मागणी मान्य केली गेली नाही तर कदाचित आंदोलन करण्याची वेळ येईल. ती वेळ आणू नका असा गर्भित इशाराही उज्ज्वल ठेंगडी यांनी दिला आहे.

या वर्षी अनेक राज्यात निवडणुका आहेत, त्यामुळे पुढेच पुरस्कार देताना त्या राज्याचा विचार करुन महाराष्ट्राला विसरु नका. कधी न कधी महाराष्ट्रातही निवडणुका येतील हे विसरु नका, असं सूचक वक्तव्य ठेंगडी यांनी केलं. वाटल्यास दादासाहेब फाळके पुरस्कार स्त्री पुरुष असा विभागून द्या असंही त्यांनी सुचवलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget