हवामान अलर्ट! विदर्भात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन
Unseasonal Rain : नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती या 5 जिल्ह्यात पावसाबरोबर गारपीट होण्याची शक्यता आहे.
नागपूर : मागील काही वर्षात सतत हवामान बदलाचा (Climate Change) फटका शेतकऱ्यांना (Farmers) बसत आहेत. दरम्यान, यावर्षी देखील अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) फटका शेतकऱ्यांना बसत आहेत. अशात आता आज पासून पुढचे पाच दिवस म्हणजेच 29 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा अनाज वर्तवण्यात आला आहे. 29 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच, 25 ते 27 फेब्रुवारीपर्यंत तीन दिवस वीजा व गडगडाटीसह होणाऱ्या पावसाबरोबर गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती या 5 जिल्ह्यात ही तीव्रता अधिक राहिल असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे योग्य नियोजन करावे, असा इशारा विभागाने दिला आहे. गेल्याच आठवड्यात विदर्भातील बहुतेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे बहुतेक भागातील रब्बीची पिके, भाजीपाला व संत्रा-मोसंबीच्या बहाराला फटका बसला होता.
अवकाळीच शेतकऱ्यांना मोठा फटका...
मागील तीन-चार वर्षांपासून सतत अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यंदा पावसळ्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने याच फटका शेतकऱ्यांना बसला होता. शेतकरी त्यातून सावरत असतनाच रब्बी हंगामात आता अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहेत. अशात आता पुढील पाच दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा अंडज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पुढील पाच दिवस पावसाची शक्यता
भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, पश्चिम हिमालयीन प्रदेशातील अनेक भागांमध्ये बर्फवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा आणि झारखंड या राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, केरळमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार, 26 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि 26 आणि 27 फेब्रुवारीला हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गडगडाट आणि विजांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन...
पुढील पाच दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना देखील बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे योग्य नियोजन करावे, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :
Weather Update : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता, 'या' राज्यांमध्येही अलर्ट जारी