एक्स्प्लोर

Nagpur News : नागपुरातील 'या' भागांत गुरुवारी 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद; काही वस्त्यांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा

Nagpur Water Supply : खंडीत पाणीपुरवठा 24 तारखेला दुपारपर्यंत सुरळीत होईल, असे OCW तर्फे सांगण्यात आले. या कालावधीत बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

Nagpur News : नागपूर महानगरपालिकेने (NMC) 600 एमएम व्यासाच्या जलवाहिनीला 700 एमएम व्यासाच्या मेडिकल जलवाहिनीशी मोक्षधाम घाट येथे जोडण्याकरता येत्या 23 फेब्रुवारी रोजी 24 तासांचे शटडाऊन करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी मेडिकल आणि अजनी रेल्वेच्या परिसरातील वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

या कामासाठी मेडिकल मुख्य जलवाहिनीवरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल GMC (मेडिकल कॉलेज) आणि नजीकचा संपूर्ण परिसर तसेच अजनी रेल्वे आणि नजीकचा संपूर्ण परिसर, त्याचबरोबर दक्षिण-पश्चिम-मध्य रेल्वे, टाटा कॅपिटल, गणपती अपार्टमेंट, इंदिरानगर स्लम, जाटतरोडी आणि राजाबाक्षा या भागांचा पाणीपुरवठा संपूर्णपणे बंद बंद राहणार आहे. पाणीपुरवठा 24 तारखेला दुपारपर्यंत सुरळीत होईल, असे ओसीडब्ल्यूतर्फे सांगण्यात आले आहे. या कालावधीत बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

काही वस्त्यांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा

जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे गोधनी पेंच 4 जलशुद्धीकरण केंद्रावर आधारित नागपूर शहरातील नारा, नारी/ जरीपटका, धंतोली, लक्ष्मीनगर, नालंदानगर, श्रीनगर, ओंकारनगर 1 आणि 2, म्हाळगीनगर या जलकुंभांतून वस्त्यांना होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने आणि मर्यादित राहणार आहे. 23 फेब्रुवारीच्या रात्रीनंतर पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. ही परिस्थिती किमान 5 ते 6 दिवस राहणार असल्याचे ओसीडब्ल्यूद्वारे कळविण्यात आले आहे.

मनपाच्या 'या' झोनमधील पाणीपुरवठा होणार थेट

  • नेहरूनगर झोन आणि लकडगंज झोनमधील पाणीपुरवठा बळकटीकरण करण्याच्या हेतूने नागपूर महानगरपालिका आणि ओसीडब्ल्यू यांनी 4.2 किमी लांबीची 800 एमएम व्यासाची मोठी जलवाहिनी शताब्दी (चौक (रिंग रोड ) ते सक्करदरा जलकुंभदरम्यान टाकली आहे. 
  • या जलवाहिनीद्वारे सक्करदरा जलकुंभ आता गोधनी पेंच-4 या जलशुद्धीकरण केंद्राशी थेट जोडले जाणार आहे. त्यामुळे सक्करदरा 1, 2, 3 या जलकुंभाअंतर्गत येणाऱ्या नेहरूनगर झोनमधील आणि लकडगंज झोनमधील वस्त्या यांना अधीकचा 17 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणार आहे. 
  • 4.2 किमी जलवाहिनीच्या फ्लशिंगचे काम पूर्ण झाले आहे. 23 फेब्रुवारीच्या रात्रीपासून जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. आतापर्यंत सक्करदरा 1, 2 आणि 3 या जलकुंभाला कन्हान जलशुद्धीकरण केंद्रावरुन पाणीपुरवठा होत होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bachchu Kadu : ... तर लिलावात शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करणाऱ्यांचे हातपाय तोडू; बच्चू कडू यांचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget