(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विजयकुमार गावितांची आदिवासी समाजाच्या आंदोलनाला भेट; आंदोलकांनी गावितांची गाडी अडवली, गोंधळाची परिस्थिती
आदिवासी मंत्री हे आंदोलन स्थळावरून बाहेर निघत असतांना घरकुलाचे प्रश्न घेऊन आदिवासी महिलांनी मंत्र्यांची गाडी अडवली. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
नागपूर: आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी आज नागपूरच्या संविधान चौकात सुरु असलेल्या आदिवासी समाजाच्या आंदोलन स्थळाला भेट दिली. धनगर समाजाला (Dhangar Reservation) आदिवासी प्रवर्गात अंतर्गत आरक्षण देऊ नये यासाठी नागपूरच्या संविधान चौकात आदिवासी समाजाचे बुधवारपासून साखळी उपोषण सुरु आहे.आदिवासी मंत्री गावित यांनी आंदोलकांची मागणी मान्य केली. सोबतच आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा केली. मात्र आदिवासी मंत्री हे आंदोलन स्थळावरून बाहेर निघत असतांना घरकुलाचे प्रश्न घेऊन आदिवासी महिलांनी मंत्र्यांची गाडी अडवली. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. लवकरचं हा प्रश्न पण निकाली काढला जाईल असे आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी सांगितले .
आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांच्या मध्यस्थीनंतर देखील लेखी आश्वासन मिळत नाही तेव्हापर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका नागपूरच्या संविधान चौकात सुरु असलेल्या कृती समितीच्या आंदोलकांनी घेतली
प्रमुख मागण्या काय आहेत?
- महाराष्ट्रातील आदिवासींच्या (अनुसूचित जमाती) आरक्षणामध्ये धनगर अथवा ईतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये.
- गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय सुराबर्डी नागपूर येथे कायम ठेवावे.
- कंत्राटी पद भरती रद्द करण्यात यावी
- अनुसुचित जमाती युवकांसाठी विशेष पद भरती करण्यात यावी.
- शासकीय आदिवासी वसतिगृह मधील भोजन डी.बी. टी.बंद करून पूर्ववत मेस सुरू करण्यात यावे.
या प्रमुख मागण्यासाठी आदिवासी समाजाच्या सर्व सामाजिक संघटना मिळून "संयुक्त आदिवासी कृती समिती"चे 27 सप्टेंबरपासून संविधान चौक हे साखळी उपोषण सुरु आहे.
गावित यांनी कोणत्या घोषणा केल्या?
- आदिवासींमध्ये कुठल्याही जातीचा सहभाग केला जाणार नाही
- आंदोलन काळातील गडचिरोली येथे रास्ता रोखो केला म्हणून आदिवासी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात येणार
- आदिवासींना शहरीहद्दीत घरकुल योजना राबवतांना आदिवासींच्या कोट्यात वाढ करण्यात येईल
- आदिवासींकडे घरकुलसाठी जागा नसेल ती जागा घेण्यासाठी आदिवासी विभागाकडून पैसे देण्यात येईल
- आदिवासी वसतिगृहात व आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी डीबीटी योजना बंद केली जाईल
- आश्रम शाळेतले शिक्षक तेथे राहतात का ? किती वाजता शाळेत येतात याचा शोध घेण्याची विनंती मंत्री आदिवासी आदिवासी समाजाने केली आहे
- आदिवासी समाजासाठी विशेष भरती प्रक्रिया राबवली जाईल
- सुराबर्डी येथे आदिवासी संग्रालय उभारले जाईल. हिवाळी अधिवेशनच्या पहिल्या आठवड्यात उद्घाटन होणार
हे ही वाचा :
आरक्षण समजून सांगायला आलोय, सरकार एखादा डाव टाकण्याची शक्यता, आपल्यात गट पाडू शकतं, सावध राहा : मनोज जरांगे पाटील