एक्स्प्लोर

विजय वडेट्टीवार 'यू टर्न' विरोधी पक्षनेते; त्यांची ओबीसींबद्दलची भूमिकाही संशयास्पद; आशिष देशमुखांची खोचक टीका

Ashish Deshmukh : आजपर्यंतच्या इतिहासात वडेट्टीवार यांच्यासारखा संभ्रम अवस्थेत असणारा आणि यू टर्न घेणारा विरोधी पक्षनेता या महाराष्ट्राने पाहिला नाही.

नागपूर : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) टोकाची भूमिका घेत आहेत, त्यामुळे यापुढे मी भुजबळांच्या कोणत्याही मंचावर जाणार नसल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या याच भूमिकेवरून भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत खोचक शब्दात टीका केली आहे. "विजय वडेट्टीवार हे यू टर्न विरोधी पक्षनेते असून, त्यांची ओबीसींबद्दलची भूमिकाही सुद्धा संशयास्पद असल्याचे," देशमुख म्हणाले आहेत. 

दरम्यान याबाबत बोलतांना आशिष देशमुख म्हणाले की, "अंबड येथील ओबीसी सभेत 17 नोव्हेंबरला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींबद्दलची आपली भूमिका मांडली होती. या सभेला पक्षाच्या वतीने मी देखील उपस्थित होतो. मात्र, दोन दिवस उलटत नाही तो वडेट्टीवार यांनी यावरून यू टर्न घेतलाय. त्यामुळे त्यांची ओबीसींबद्दलची भूमिका संशयास्पद आहे. वडेट्टीवार नेहमी संभ्रम अवस्थेत आपल्या भूमिका मांडत असतात. या महाराष्ट्राला विरोधी पक्षनेत्याची एक मोठी परंपरा आहे. पण आजपर्यंतच्या इतिहासात वडेट्टीवार यांच्यासारखा संभ्रम अवस्थेत असणारा आणि यू टर्न घेणारा विरोधी पक्षनेता या महाराष्ट्राने पाहिला नाही. त्यांची, बदलती भूमिका ओबीसी बांधवांच्या मनामध्ये संशय निर्माण करणारी असल्याचे देखील देशमुख म्हणाले. 

भाजपची भूमिकाही सांगितली...

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका भाजपची आहे. ओबीसी कोट्याच्या व्यतिरिक्त हे आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संपूर्ण सरकार कटीबद्धतेने काम करत आहे. त्यामुळे, यात नक्कीच यश मिळणार आहे. मात्र, असे असताना महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्यामध्ये कमतरता आली नको पाहिजे, गावागावात गुण्यागोविंदाने ओबीसी आणि मराठा समाज एकत्रित राहिले पाहिजे असेही देशमुख म्हणाले आहेत. 

नेमकं काय म्हणाले होते वडेट्टीवार? 

"ज्याप्रकारे छगन भुजबळ टोकाची भूमिका घेत आहेत ते पाहता त्यामुळे मी यापुढे भुजबळांच्या कोणत्याही मंचावर जाणार नसल्याचे मत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे. भुजबळांचा विरोध किंवा समर्थनाचा प्रश्न नाही, भूमिका टोकाची घेतल्याने विरोध आहे. भुजबळांच्या भूमिकेमुळे समाजात तेढ वाढत आहे. त्याला आमचा विरोध आहे. महत्वाचं म्हणजे भुजबळांचं मत म्हणजे समाजाची भूमिका होत नाही असंही वडेट्टीवार म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

वडेट्टीवार म्हणाले, भुजबळांच्या कोणत्याच कार्यक्रमाला जाणार नाही, भुजबळ म्हणतात, एकटा तर एकटा लढणार!

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Accident Parinay Fuke Son: मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
Mohan Bhagwat: 'आपण निसर्गाचे मालक नाही तर निसर्गाचा एक भाग आहोत'; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सरसंघचालक मोहन भागवतांनी टोचले सरकारचे कान, म्हणाले...
'आपण निसर्गाचे मालक नाही तर निसर्गाचा एक भाग आहोत'; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सरसंघचालक मोहन भागवतांनी टोचले सरकारचे कान, म्हणाले...
Rashtriya OBC Mukti Morcha: पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
Nagpur Couple Death Marathi News: दिवाळीसाठी आले, शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवले; नागपुरमधील खळबळजनक घटना
दिवाळीसाठी आले, शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवले; नागपुरमधील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
Embed widget