Vidharbha Unseasonal Rain Update : विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट; पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Vidharbha Unseasonal Rain Update : विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता आहे. नागपूर (Nagpur) वेधशाळेने सोमवारी (दि.25) विदर्भातील (Vidharbha) 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Vidharbha Unseasonal Rain Update : विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता आहे. नागपूर (Nagpur) वेधशाळेने सोमवारी (दि.25) विदर्भातील (Vidharbha) 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया व अमरावती या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट नागपूर वेध शाळेकडून देण्यात आलाय. या सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे.
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
गारपीट आणि अवकाळी पावसाच्या (Unseasonal Rain) दृष्टीने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे. आवश्यक असूनही चुकून सुद्धा झाडा खाली उभे राहू नये. जिल्ह्यातील समस्त नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे, असे आवाहन नागपूर वेध शाळेकडून करण्यात आले आहे. अनेकदा शेतातील झाडांवर वीज पडलेली दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांना झाडाखाली उभे राहू नये, असे आवाहन करण्यात आलंय.
शेतकऱ्यांनाही आवाहन करण्यात आलंय
नागपूरसह विदर्भातील पाच जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह गारपीट (Unseasonal Rain) होण्याची शक्यता आहे. शिवाय दिवसा उन्हाच्या झळा अधिक तीव्र असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हिवाळा संपण्याआधीच उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव नागरिकांना होत आहे. मात्र आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रविवार, 25 ते 27 या तीन दिवस ढगाळ वाढावरण राहून तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे थंडी वाढणार नसली तरी पावसामुळे तरी उन्हापासून दिलासा मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पिकांचे योग्य व्यवस्था करावी
गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतातील गहू, हरभरा, वेचणीला आलेला कापूस आदींसह भाजीपाला फळबागांचे मोठे नुकसान होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. संभाव्य धोका लक्षात घेता, शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेत शेतात काढलेल्या पिकांचे योग्य व्यवस्था करण्यात यावी. झालेल्या पिकाची कापणी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया व अमरावती या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना इशारा देण्यात आलाय. गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवलेली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या