Vidarbha Weather Update : विदर्भात पुन्हा अवकाळी ढग! काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
Vidarbha Weather : नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस विदर्भातील बहुतांश भागात तुरळक ते हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे.
Weather Update Today : राज्यातील काही भागात अजूनही थंडीचा (Winter) जोर कायम असला तरी आगामी काही दिवसात राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Vidarbha Rain) इशारा देण्यात आला आहे. या अवकाळी पावसाच्या पुनश्च आगमनाने शेतकऱ्यांच्या चिंतेते वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने(IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस विदर्भातील बहुतांश भागात तुरळक ते हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. पवसांच्या ढगांनी दाटी केल्याने विदर्भातील तापमानात घट झाली असून पहाटे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात धुक्याची चादर पसरल्याचे चित्र बघायला मिळाले. या पावसाचा संभाव्य धोका लक्षात घेता शेतकाऱ्यांसह नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना देखील नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत.
पुढील पाच दिवस पावसाचा इशारा
विदर्भात 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या पाच दिवसात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक ते हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. आगामी दिवसातील पावसाचे सावट बघता विदर्भातील कमाल आणि किमान तापमानात देखील मोठे बदल झाल्याचे बघायला मिळाले आहे. मधल्या काळात नागपूरसह इतरत्र वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. त्यामुळे हिवाळा संपण्यापूर्वीच विदर्भात उन्हाळा सुरू झाला का, अशी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आता पुन्हा हवेत गारवा जाणवत असून आज नागपूरसह विदर्भातील जवळ जवळ सर्व ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे चित्र आहे.
असे आहे विदर्भाचे तापमान
जिल्हे | कमाल | किमान |
अकोला | 31.4 | 17.6 |
अमरावती | 32.8 | 15.9 |
बुलढाणा | 31.0 | 15.6 |
ब्रम्हपुरी | 32.7 | 16.0 |
चंद्रपूर | 33.4 | 16.0 |
गडचिरोली | 30.6 | 14.8 |
गोंदिया | 28.9 | 12.9 |
नागपूर | 29.2 | 16.0 |
वर्धा | 31.0 | 16.2 |
वाशिम | 32.5 | 15.6 |
यवतमाळ | 32.0 | 18.2 |
देशातील हवामानाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात कोकण वगळता उर्वरित राज्यातील काही भागांत शुक्रवारी आणि शनिवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे राज्यातील किमान व कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ झाली आहे. देशाची स्थिती पाहता पुन्हा एकदा हवामान बदलण्यास सुरुवात झाली आहे. पहाटेची थंडी आणि दिवसा कडक ऊन असा काहीसा अंदाज आहे.
थंडीची लाट कायम असली तरी लोकांना थंडी कमी जाणवू लागली आहे. दरम्यान, हवामान खात्याचे म्हणणे आहे की मध्य भारतात 10 ते 13 फेब्रुवारी आणि पूर्व भारतात 13 ते 15 फेब्रुवारीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. मात्र, महाराष्ट्रात तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे.
इतर महत्वाच्या बातम्या