एक्स्प्लोर

Nagpur News : माजी आमदारांचे 'सन्मान' भंगारात; 50, 100 रुपयांत विक्री

माजी आमदार अनिल सोले यांना मिळालेले पुरस्कार/सन्मान चिन्ह विकत घेण्यासाठी लोक भंगार विक्रेत्याकडे गर्दी करत होते. त्यानंतर ही माहिती वाऱ्यासारखी पसरली अन् आमदाराच्या पीएला धावाधाव करावी लागली.

Nagpur News : नागपूर शहराचे माजी महापौर, भाजपचे माजी आमदार, शिक्षक सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले (Anil Sole) यांना आजवर मिळालेले विविध पुरस्कार व सन्मानचिन्ह आज चक्क भंगार विक्रेत्याकडे आढळले. तेथे भंगारवाला 50 ते 100 रुपयांत या पुरस्कारांची विक्री करताना आढळला. माजी आमदारांना मिळालेले पुरस्कार/सन्मान चिन्ह विकत घेण्यासाठी काही लोक तेथे गर्दी करताना आढळले. हा प्रकार धक्कादायक असल्याचे उपस्थित लोक म्हणाले.

माजी आमदार, शिक्षक सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अनिल सोले यांना विविध संघटना, विद्यापीठांनी दिलेल्या सन्मान आणि पुरस्काराचा कचरा झाला आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कार भंगारच्या दुकानामध्ये विकण्यात आले. त्या पुरस्काराची विक्री 50 ते 100 रुपयांत केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे सन्मानाचा 'कचरा' केल्याचे बोलले जात आहे. अनिल सोले हे नागपूर विधानपरिषदेचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार होते. त्या काळात त्यांना अनेक आघाडीच्या आणि ते ज्या विचाराशी संलग्नित आहेत, त्या संस्थांनी सत्कार केल्यानंतर पुरस्कार अथवा सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. 

स्वीय सहाय्यकाची धावाधाव

प्रा. सोलेंना मिळालेल्या पुरस्कार अथवा सन्‍मानामध्ये गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या सन्मान चिन्ह. चिमूरचे आमदार बंटी भागडिया यांनी आयोजित केलेल्या शहीद स्मृती दिनाच्या कार्यक्रमातील सन्‍मान चिन्ह, लोकमान्य सांस्कृतिक क्रीडा मंडळ रेशीमबागने दिलेले भारत मातेच्या छायाचित्राचे स्मृति चिन्ह, विदर्भ हिंदी साहित्य संघाचा प्रेरणा पुंज सन्मान, सरसंघचालक गोळवळकर गुरुजी यांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्हही रामदास पेठ येथील फुटपाथवर भंगारात पडलेले होते. सोले यांना मिळालेले पुरस्कार भंगारच्या दुकानात असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक विजय फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयात मिळाली. 

विकलेल्या पुरस्कारांचे काय? 

माहिती मिळताच तातडीने ते रामदास पेठ येथील भंगारवाल्याकडे आले. त्याच्याकडून सर्वच पुरस्कार परत मागितले. त्यावेळी सोले यांच्या कार्यालयाचे स्थलांतर करण्यात येत आहे. त्यामुळे हे पुरस्कार एका पोत्यात भरुन ठेवलेले होते. कर्मचाऱ्यांना रद्दी विकण्यासाठी सांगितले. परंतु त्यांनी रद्दी समजून पुरस्काराचे पोतेही येथे आणले असावे. आम्ही नवीन कार्यालयात पुरस्कार ठेवण्यासाठी ते पोते शोधत होतो. तेवढ्यात पुरस्कार रद्दी विक्रेत्याकडे असल्याची माहिती मिळाली. तातडीने येथे पोहोचलो आणि सर्वच पुरस्कार परत घेतले. मात्र, या नाट्याच्या मधात काही पुरस्कार अज्ञात व्यक्तींनी 50 आणि 100 रुपयांत विकत घेतले. त्याचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

ही बातमी देखील वाचा

Nagpur ZP : जिल्हा परिषदेच्या 700 कोटींच्या कामांना स्थगिती; माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह काँग्रेस नेते आक्रमक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदेंच्या नेत्यांचा आंतरवाली सराटीत भेटीगाठींचा खेळ चाले, अन् केसरकर राज ठाकरेंच्या भेटीला; उदय सामंतांनी 'राज'कारण सांगितले!
शिंदेंच्या नेत्यांचा आंतरवाली सराटीत भेटीगाठींचा खेळ चाले, अन् केसरकर राज ठाकरेंच्या भेटीला; उदय सामंतांनी 'राज'कारण सांगितले!
Video: सुजय विखेचं ढोंग सगळ्यांना माहितीय; संयमी बाप संतापला, बाळासाहेब थोरातांनी टाळ्या वाजवणाऱ्यांनाही सुनावलं
सुजय विखेचं ढोंग सगळ्यांना माहितीय; संयमी बाप संतापला, बाळासाहेब थोरातांनी टाळ्या वाजवणाऱ्यांनाही सुनावलं
Babanrao Gholap : ठाकरेंनी मुलाला तिकीट देताच शिंदे गटाच्या बबनराव घोलपांचा राजीनामा; म्हणाले, शिवसेनेचे फार मोठे उपकार!
ठाकरेंनी मुलाला तिकीट देताच शिंदे गटाच्या बबनराव घोलपांचा राजीनामा; म्हणाले, शिवसेनेचे फार मोठे उपकार!
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक म्हणतात, नाना कदमांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो, कृष्णराजला उमेदवारी दिल्यास चांगलं काम करेल!
धनंजय महाडिक म्हणतात, नाना कदमांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो, कृष्णराजला उमेदवारी दिल्यास चांगलं काम करेल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Balasaheb Thorat PC | एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे महिलांबाबत बोलायचं, थोरात संतापलेABP Majha Headlines :  2 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सJayashree Thorat Ultimatum : वसंत देशमुखांना 24 तासांत अटक करा - जयश्री थोरातUday Samant on Aashish Shelar : सरवणकरांना डावलणं अयोग्य; पडत्या काळात तेच सोबत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदेंच्या नेत्यांचा आंतरवाली सराटीत भेटीगाठींचा खेळ चाले, अन् केसरकर राज ठाकरेंच्या भेटीला; उदय सामंतांनी 'राज'कारण सांगितले!
शिंदेंच्या नेत्यांचा आंतरवाली सराटीत भेटीगाठींचा खेळ चाले, अन् केसरकर राज ठाकरेंच्या भेटीला; उदय सामंतांनी 'राज'कारण सांगितले!
Video: सुजय विखेचं ढोंग सगळ्यांना माहितीय; संयमी बाप संतापला, बाळासाहेब थोरातांनी टाळ्या वाजवणाऱ्यांनाही सुनावलं
सुजय विखेचं ढोंग सगळ्यांना माहितीय; संयमी बाप संतापला, बाळासाहेब थोरातांनी टाळ्या वाजवणाऱ्यांनाही सुनावलं
Babanrao Gholap : ठाकरेंनी मुलाला तिकीट देताच शिंदे गटाच्या बबनराव घोलपांचा राजीनामा; म्हणाले, शिवसेनेचे फार मोठे उपकार!
ठाकरेंनी मुलाला तिकीट देताच शिंदे गटाच्या बबनराव घोलपांचा राजीनामा; म्हणाले, शिवसेनेचे फार मोठे उपकार!
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक म्हणतात, नाना कदमांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो, कृष्णराजला उमेदवारी दिल्यास चांगलं काम करेल!
धनंजय महाडिक म्हणतात, नाना कदमांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो, कृष्णराजला उमेदवारी दिल्यास चांगलं काम करेल!
आशिष शेलार म्हणाले, अमित ठाकरे आपल्याच घरातील; उदय सामंतांनीही करुन दिली पडत्या काळाची आठवण
आशिष शेलार म्हणाले, अमित ठाकरे आपल्याच घरातील; उदय सामंतांनीही करुन दिली पडत्या काळाची आठवण
करमाळ्यात संजयमामांच्या विरोधात भाजपचा प्लॅन, रश्मी बागलांना उतरवणार मैदानात?  बागल फडणवीसांच्या भेटीला
करमाळ्यात संजयमामांच्या विरोधात भाजपचा प्लॅन, रश्मी बागलांना उतरवणार मैदानात? बागल फडणवीसांच्या भेटीला
मोठी बातमी :  मनसेचं ठरलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही, कारण...
मोठी बातमी : मनसेचं ठरलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही, कारण...
'वसंतराव देशमुखांच्या वक्तव्याचा निषेध, पण सुजय विरोधात पूर्व नियोजित कट'; शालिनी विखे पाटलांचा गंभीर आरोप
'वसंतराव देशमुखांच्या वक्तव्याचा निषेध, पण सुजय विरोधात पूर्व नियोजित कट'; शालिनी विखे पाटलांचा गंभीर आरोप
Embed widget