![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Aryuveda : 'आयुष' उपचार पद्धतीचा फायदा काय? लवकरच सर्व्हेक्षण होणार सुरू
घरातील व्यक्तीला आजारी झाल्यास मोठा खर्च होतो. काहींवर उपचारासाठी कर्जबादारी होण्याची वेळही येते. उत्पन्न व किती साधारणतः उपचारावर किती खर्च होतो, याची माहिती या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून घेणार आहे.
![Aryuveda : 'आयुष' उपचार पद्धतीचा फायदा काय? लवकरच सर्व्हेक्षण होणार सुरू The survey will start soon regards the benefit of Ayush method of treatment Aryuveda : 'आयुष' उपचार पद्धतीचा फायदा काय? लवकरच सर्व्हेक्षण होणार सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/30/6437d4c684686100890d020f85e04fc2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूरः आयुष मंत्रालय अंतर्गत आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्यात येते. या पद्धतीने किती लोक उपचार घेतात व त्याचा होत असलेला फायदा याची माहिती केंद्र सरकार घेणार आहे. आयुषमध्ये असलेल्या त्रृटी दूर करून ते अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.
आयुर्वेदाचे असलेले महत्त्व लक्षात घेता केंद्र सरकारने 2014मध्ये आयुष मंत्रालय निर्माण केले. याअंतर्गत आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, होमिओपॅथी इत्यादींसह पारंपारिक पद्धतीने उपचार करण्यात येते. देशभरात आयुषचे कार्यालय सुरू करण्यात आले. कोरोना काळात आयुषमार्फत देण्यात आलेल्या औषधांचा वापरही झाला. ही उपचार पद्धत स्वस्त असली तरी अॅलोपॅथीच्या तुलनेत याचा वापर कमी असल्याचे सांगण्यात येते. आयुष अंतर्गत देण्यात येणाऱ्या उपचारचा किती लोकांनी वापर केला. कोणत्या प्रकारचे रुग्ण याचा अधिक वापर करतात याची माहिती सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. योगा, युनानी उपचार पद्धतीचा उपयोग किती लोक करतात, याचाही आढावा या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
आयुर्वेद उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली
कोरोनाकाळापासून देशभरात नागरिकांकडून आपल्या आहाराकडे जास्त लक्ष देण्यात येत आहेत. तसेच नागरिकांकडून आपल्या आरोग्याबाबत अधिक काळजी घेण्यात येत आहे. दुसरीकडे नैसर्गिक पद्धतीने जीवन जगण्याचा प्राधान्य देण्यात येत असल्याने आयुर्वेद उपचार घेणाऱ्यांच्या संख्येचा आलेखही बराच वाढला आहे.
किती लोकांकडे विमा?
या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून किती लोकांकडे हेल्थ इंश्युरन्स आहे. ईएसआयसी, सीजीएचएस अंतर्गत किती लोकांकडे सुरक्षा आहे, याचीही माहिती गोळा करण्यात येणार आहे.
उपचारावर किती खर्च?
व्यक्ती कष्टाने, मेहनतीने, काटकसर करून भविष्याच्या दृष्टिकोनातून पैसे गोळा करतो. परंतु घरातील व्यक्तीला आजार झाल्यास मोठा खर्च त्यावर होतो. काहींवर तर उपचारासाठी कर्जबादारी होण्याची वेळही येते. घरातील व्यक्तीचे उत्पन्न व किती साधारणतः उपचारावर किती खर्च होतो, याची माहिती या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून सरकार घेणार आहे.
ED Raid Sanjay Raut : मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि सकाळी राऊतांवर कारवाई; चर्चांना उधाण
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)