एक्स्प्लोर

Indian Science Congress: सर्व सामान्यांसाठी खुली 'विज्ञानाची महाजत्रा'; इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये निशुल्क प्रवेश

ISC : स्टॅालच्या बाहेर ऑलिम्पिकच्या धर्तीवर विज्ञानविषयक ज्योत तेवत असणार आहेत. त्याबाजुला स्पेस ऑन व्हिल्स ही गाडी असणार आहे. यात इस्त्रोची माहिती  देण्यात येणार आहे.

Indian Science Congress News : विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा कुंभमेळा असणारे इंडियन सायन्स काँग्रेस म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कोप-या कोप-यामध्ये ज्ञानाचा खजिना साठवलेले प्रदर्शन आहे. ऐकायचे असेल तर नवल, बघायचे असेल तर नवल आणि अनुभवयाचे असेल तर विज्ञानाची अनुभूती असे वातावरण या ठिकाणी आहे. सामान्य नागरिकांसाठी ही परिषद खुली आहे. विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरामध्ये अमरावती रोडवरून या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी प्रयोजन आहे. 

नोंदणी न करताही विज्ञान प्रदर्शनीला भेट -

उजव्या बाजुला नोंदणी करण्याचे मोठे डोम आहे. या ठिकाणी आपली नोंदण करता येते. नोंदणी न करता देखील या ठिकाणी असणा-या विज्ञान प्रदर्शनीला भेट देता येते. या विज्ञान प्रदर्शनीत एकूण ए ते एफ असे सहा हॅाल असणार आहेत. हॅाल ए मध्ये आयआयटी मद्रास,  इंडियन मेरिटाईम युनिव्हर्सिटी, सेंट्रल ग्राऊंड वॅाटर बोर्ड, कौन्सिल आफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च आदी स्टॅाल असणार आहेत. यासोबतच नागपुरातील अनेक महाविद्यालये आणि शासकीय संस्थांचे स्टॅाल या हॅालमध्ये असणार आहेत. 

'हॉल बी'मध्ये... -

हॅाल बी मध्ये केंद्र शासनाच्या विविध संस्थांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. यात झुलॅाजिकल सर्वे  ऑफ इंडिया, रजिस्टार जनरल आफ इंडिया, व्हीएनआयटी, ब्युरो आफ इंडियन स्टँडर्ड, इंडियन  इन्स्टिट्यूड आफ ॲस्ट्रोफिजिक्स, इंडियन कौन्सिल फार मेडिकल रिसर्च आदी संस्थांचा समावेश असेल.

'हॉल डी'मध्ये... -

हॅाल सी, डी आणि ई हे हॅालमध्ये देखील विज्ञान विषयावर आधारित शासकीय तसेच खाजगी  संस्थांचे स्टॅाल असणार आहेत. अत्यंत माहितीपूर्ण व आकर्षक असा हॅाल हा डीआरडीओ या संरक्षण संस्थेचा असणार आहे. यात डीआरडीओच्या छत्राखाली येणा-या विविध निर्मिती संस्थांचे स्टॅाल असणार आहेत. अत्यंत वैविध्यपूर्ण असणाऱ्या या हॅालमध्ये डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी, सॅालिड स्टेट फिजिक्स लेबॅारेटरी, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी, अशा अनेक माहिती नसलेल्या संस्थांची माहिती देण्यात येणार असणार आहे.

'विज्ञान ज्योत'... -

स्टॅालच्या बाहेर ऑलिम्पिकच्या धर्तीवर विज्ञानविषयक ज्योत तेवत असणार आहेत. त्याबाजुला स्पेस ऑन व्हिल्स ही गाडी असणार आहे. यात इस्त्रोची माहिती  देण्यात येणार आहे.  ख-या अर्थाने विविधांगी विज्ञान विषयक विविध संस्था, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारे हे विज्ञान प्रदर्शन असणार आहे. यासोबतच विविध प्लेनरी सत्रांचे आयोजन करण्यात आले आहेत. या विज्ञानविषयक चर्चा करण्यात येणार आहे.  या विज्ञान परिषदेला अवश्य भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

ही बातमी देखील वाचा...

इस्त्रोची माहिती देणारी गाडी 'स्पेस ऑन व्हिल्स' ; इंडियन सायन्स काँग्रेसमधील विशेष आकर्षण

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Bus Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहताच सीटवरचा कंडक्टर ताडकन उठला!
Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहून कंडक्टर ताडकन उठला!
Sangli Loksabha : सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सत्यजीत तांबेंचा सल्ला घेणार, निवडणूक लढवणार, काँग्रेस सोडून वंचितमध्ये दाखल होताच उत्कर्षा रुपवतेंनी रणशिंग फुंकलं!
काँग्रेस सोडून वंचितमध्ये जाताच उमेदवारी, सत्यजीत तांबेंचा सल्ला घेणार, उत्कर्षा रुपवतेंनी प्लॅनिंग सांगितलं
Video: अशोक चव्हाणांच्या सभेत राडा; मराठा बांधव आक्रमक, सभा थांबवून स्वीकारलं निवेदन
Video: अशोक चव्हाणांच्या सभेत राडा; मराठा बांधव आक्रमक, सभा थांबवून स्वीकारलं निवेदन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Supriya Sule :सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडलाNitin Gadkari Voting : 101% विजय माझाच होईल, नितीन गडकरी कुटुंबासह मतदान केंद्रावरShyamkumar Barve : रामटेकची लढाई ही महिला सन्मानाची - श्यामकुमार बर्वेNamdev Kirsan Gadchiroli : गडचिरोलीतील मविआ उमेदवार नामदेव किरसान यांचं मतदान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Bus Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहताच सीटवरचा कंडक्टर ताडकन उठला!
Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहून कंडक्टर ताडकन उठला!
Sangli Loksabha : सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सत्यजीत तांबेंचा सल्ला घेणार, निवडणूक लढवणार, काँग्रेस सोडून वंचितमध्ये दाखल होताच उत्कर्षा रुपवतेंनी रणशिंग फुंकलं!
काँग्रेस सोडून वंचितमध्ये जाताच उमेदवारी, सत्यजीत तांबेंचा सल्ला घेणार, उत्कर्षा रुपवतेंनी प्लॅनिंग सांगितलं
Video: अशोक चव्हाणांच्या सभेत राडा; मराठा बांधव आक्रमक, सभा थांबवून स्वीकारलं निवेदन
Video: अशोक चव्हाणांच्या सभेत राडा; मराठा बांधव आक्रमक, सभा थांबवून स्वीकारलं निवेदन
Premachi Goshta Serial Update : कार्तिकच्या षडयंत्रात मुक्ता फसणार! प्रेमासाठी आता सागर काय करणार?
कार्तिकच्या षडयंत्रात मुक्ता फसणार! प्रेमासाठी आता सागर काय करणार?
PBKS Ashutosh Sharma: मुंबईची धाकधूक वाढवणाऱ्या आशुतोषची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी, एक वेळचं जेवणही मिळत नव्हतं!
मुंबईची धाकधूक वाढवणाऱ्या आशुतोषची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी, एक वेळचं जेवणही मिळत नव्हतं!
लग्नासाठी निघालेल्या दोन भावांचा नाहक जीव गेला; वेगातील कारची जोरदार धडक
लग्नासाठी निघालेल्या दोन भावांचा नाहक जीव गेला; वेगातील कारची जोरदार धडक
Ravi Kishan : ''आम्ही खोटं बोलतोय मग DNA चाचणी करा''; रवी किशनच्या कथित मुलीचे आव्हान
''आम्ही खोटं बोलतोय मग DNA चाचणी करा''; रवी किशनच्या कथित मुलीचे आव्हान
Embed widget