एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2022 : श्री संती गणेशोत्सव मंडळ साकरतोय वृंदावनच्या श्री बाँकेबिहारी मंदिराची प्रतिकृती, भाविकांसाठी बुस्टर डोसचीही सुविधा

प्रतिकृतीच नव्हे तर श्री बाँकेबिहारी यांची पारंपारिक आरती, रोज होणारा श्रृंगार आरती, भोग वृंदावन प्रमाणेच वातावरण निर्मितीचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक संजय चिंचोळे यांनी दिली.

नागपूरः विविध सामाजिक उपक्रमांत सदैव अग्रेसर असणाऱ्या श्री संती गणेशोत्सव (Santi Ganeshutsav Mandal) व सांस्कृतिक मंडळातर्फे यावर्षी गणेशोत्सवानिमित्त नागपुरकरांना वृंदावनच्या श्री बाँकेबिहारी मंदिराचे दर्शन घडवून आणण्यात येणार आहे. यासाठी दारोडकर चौक परिसरात श्री बाँकेबिहारी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. फक्त प्रतिकृतीच नव्हे तर श्री बाँकेबिहारी (Vrindavan Banke Bihari Temple) यांची सकाळी व संध्याकाळी होणारी पारंपारिक आरती, रोज होणारा श्रृंगार आरती, प्रसाद/ भोग आदींद्वारे वृंदावन प्रमाणेच वातावरण निर्मितीचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक संजय चिंचोळे यांनी दिली. पुजापाठ, प्रसाद वितरण व आपण वृंदावनला येवून साक्षात श्री बांकेबिहारीचेच दर्शन घेत आहोत असे हुबेहुब वातावरण नागपूरातच तयार करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.

गणेशस्थापनेचे मंडळाचे यंदाचे 65 वे वर्ष असून मागिल पंधरा वर्षात नागपूरच नव्हे तर विदर्भात मंडळाने आपली ख्याती निर्माण केली असून मंडळाने यापूर्वी संत श्री गजानन महाराज मंदिर, शेगाव, जंग आझादीकी (1857 च्या संग्रामावर आधारीत देखावा) श्री साईबाबा मंदिर शिर्डी,  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर, तिरूपती बालाजी मंदिर, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर अक्कलकोट, आद्य ज्योतिर्लिंग मंदिर त्र्यंबकेश्वर, तुळजाभवानी मंदीर तुळजापुर सप्तश्रृंगी देवी मंदीर नाशिक, श्री खंडोबा मंदिर जेजुरी, श्री श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर पीठापुरम, श्री योगेश्वरी देवी मंदिर, अबेजोगाई, महाकालेश्वर मंदिर, उज्जैन, शारदादेवी मंदिर, मैहर, अष्टविनायक दर्शन इत्यादी सुप्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती तयार करून नागपूरात नव्हे तर संपूर्ण विदर्भात एक आपली विशेष व आगळीवेगळी ख्याती व ओळख निर्माण केलेली आहे. दरवर्षी जवळपास ३ लाखांच्या वर भावीक मंडळाच्या या उत्सवाला दहा दिवसात भेट देतात.

'आदर्श गणेशोत्सव'चे मानकरी

श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक (Cultural events)  मंडळ वर्षभर विविध सामाजीक, धार्मीक, सांस्कृतिक, शैक्षणीक व धर्मादाय इ. कार्यक्रमाचे आयोजन करीत करण्यात येतात. यात हिंदू नववर्ष, राम नवमी, गीतरामायण दिवाळी उत्सव, हनुमान जयंती, संगीत क्षेत्रातील विविध गायक कलाकारांचे सुगम संगीताचे कार्यक्रम, विविध व्याख्यानमालांचे आयोजन, सर्व थोर पुरूषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आदी उपक्रम राबविण्यात येतात. मंडळात 1958 पासून गणेशस्थापना करण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाला मुर्ती, सजावट, विषय, संकल्पना व एकूण सर्व व्यवस्था यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालय, नागपूर तर्फे 'आदर्श गणेशोत्सव' स्पर्धेचा नागपूर शहरातून प्रथम पुरस्कार प्राप्त होत असून विविध संस्थांद्वारे सुद्धा मंडळाचा गौरव करण्यात येतो.

दररोज इस्कॉनतर्फे भजन किर्तन व सत्संगाचे आयोजन

यंदा दररोज संध्याकाळी 7.30 ते 10 पर्यंत इस्कॉनतर्फे (Iskcon Nagpur) भजन किर्तन व सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मंदिरात श्रीकृष्णाच्या अकरा प्रमुख लीलांचे चित्ररूपदर्शन सुद्धा याठिकाणी होणार आहे. तसेच श्रीकृष्णाचा शयनकक्ष व पाळणा सुद्धा याठिकाणी भक्तांच्या दर्शनासाठी राहणार आहे. गणरायाची अकरा फुटाची सुंदर विलक्षण व सुबक मुर्ती तसेच वृदांवन येथील श्रीकृष्णाच्या मुर्तीची हुबेहुब मुर्ती आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. तसेच या उत्सवादरम्यान लहान मुलांच्या विविध स्पर्धा जसे चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, महिलांसाठी उखाणे स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन तसेच एक दिवस रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात येणार आहे.. सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे तसेच मेटल डिटेक्टर, अग्नीसुरक्षा यंत्र त्याच प्रमाणे 15-20 सुरक्षाकर्मी तैनात राहणार आहेत व मंडळाचे जवळपास 200 महिला व पुरूष कार्यकर्ते भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी सज्ज राहतील.

उत्सवाकरीता मुर्तीकार राकेश पाठराबे, सजावट श्रीकांत डेकोरेशन (संदिप भुंबर, श्रीकांत तल्हार) व कलकत्ता, पुणे, भोपाळ व मुंबई येथून आलेले ५० कलाकार विद्युत व्यवस्था बबलु इलेक्ट्रीकल्स ध्वनी व्यवस्था- प्रशांत साऊंड सर्विस व व्हिडीओ व्यवस्था राजु उजवणे व संच यांची आहे. पत्रपरिषदेत संयोजक संजय चिंचोले यांनी माहिती दिली. यावेळी राजेश श्रीमानकर, अनिल वलोकर, दिनेश बावरे, सुनिल साऊरकर, मंगेश वड्याळकर, रोहन बोरकर, मुकुंद सपकाळ, अनिल जोशी, प्रदीप वड्याळकर, राजू गुप्ता उपस्थित होते. मनपा प्रशासनातर्फे तलावात विसर्जन बंदीचे आदेश देण्यात आले आहे. हा निर्णय पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून आम्ही याचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रीया संजय चिंचोळे यांनी दिली.

बुस्टर डोसचीही सुविधा

कोरोना पूर्णपणे संपला नसून आत्ताही काही प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहे. यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून मंडळातर्फे दररोज सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान बुस्टर डोसचीही सुविधा मंडळातर्फे करण्यात आली आहे. येथे नागरिकांसाठी दोन्ही कोव्हिशिल्ड आणि कोवॉक्सिन दोन्ही लस उपलब्ध असणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

'नागपूरच्या राजा'चे आगमन

'नागपूरचा राजा' (Nagpurcha Raja) ला नागपुरात मानाचे गणपती असा दर्जा असून मंडळाने आज चितार ओळ परिसरातील मूर्ती शाळेतून नागपूरच्या राजाची मूर्ती तुळशीबाग परिसरातील त्यांच्या मंडपात नेली. नागपूरचा राजा मंडळाचा यंदाचा 26 वा वर्ष असून महापालिकेने आखलेल्या नियमाप्रमाणे यंदा मंडळांनी अवघ्या चार फुटांची मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दहा दिवस आम्ही मनोभावे धार्मिक विधीप्रमाणे श्रींची पूजा करू. गणेशोत्सवामध्ये पूजेला जास्त महत्त्व असून भाविकांनीही कोरोना संदर्भात काळजी घेत संध्याकाळीच श्रींच्या दर्शनासाठी यावे. रात्री नऊ नंतर आम्ही दर्शन बंद ठेवण्याचा विचार करत आहोत अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष दीपक जयस्वाल यांनी दिली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : अमोल मिटकरी तुमची पंकजा मुंडेंवर बोलण्याएवढी उंची नाहीः चंद्रशेखर बावनकुळे

RTMNU : प्राचार्यं, प्राध्यापकांच्या बदलीचे अधिकार संस्थांना, विद्यापीठाने काढले पत्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget