Pachmarhi : पचमढी यात्रेसाठी नागपूरहून विशेष बसफेऱ्या ; दुपारपासून दर अर्ध्या तासाने सुटणार बसेस, असे करा बुकिंग...
गणेशपेठ बसस्थानक येथे जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी पूर्वीच आरक्षण करून घेण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आगार व्यवस्थापक, बसस्थानक प्रमुखांसोबत संपर्क साधता येईल.
Nagpur to pachmarhi Bus : महाशिवरात्रीच्या पर्वावर मध्यप्रदेशातील पचमढी जवळच्या मोठा महादेव गडावर भव्य यात्रा भरते. नागपूरसह विदर्भातील भाविक लाखोंच्या संख्येने या यात्रेत सहभागी होतात. भाविकांच्या सुविधेच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नागपूर (Nagpur) येथून विशेष बसफेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे. 10 ते 19 फेब्रुवारी दरम्यान गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानक येथून दुपारपासून दर अर्धा तासाने बसफेऱ्या सोडण्यात येतील. पचमढी येथून परतण्यासाठीही बस फेऱ्या सोडण्यात येणार आहे. या व्यवस्थेमुळे पचमढीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळेल.
गणेशपेठ बसस्थानक येथे आरक्षण व्यवस्था
गणेशपेठ बसस्थानक येथे जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी पूर्वीच आरक्षण करून घेण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आगार व्यवस्थापक, बसस्थानक प्रमुखांसोबत संपर्क साधता येईल. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेऊन सुरक्षित व आरामदायी प्रवास करण्याचे आवाहन विभाग नियंत्रक निलेश धारगावे यांनी केले आहे.
नागपूर ते पचमढी बस सुटण्याच्या वेळा
दुपारी 4, 4.30, 5, 5.30, 6, 6.15, 6.30, 7, 7.15, 7.30, 8, 8.15, 8.30, 9, 9.30, 9.45, 10, 10.30, 11.
पचमढी ते नागपूर बस सुटण्याच्या वेळा
दुपारी 3, 3.15, 3.30, 4, 4.30, 5, 5.30, 6, 6.30, 7, 7.30, 7.45, 8, 8.30, 9, 9.15, 9.30, 10, 10.30.
उत्पन्न वाढीसाठी एसटीचा पुढाकार; समृद्धी महामार्गावरुन दररोज नागपूर ते शिर्डी
एसटी महामंडळाकडून नागपूर ते शिर्डी बस सेवेची सुरुवात 15 डिसेंबरपासून करण्यात आली आहे. ही बस नॉनस्टॉप राहणार असून दररोज ही गणेशपेठ येथील बसस्थानकावरुन निघेल. याआधी नागपूर ते शिर्डी थेट बससेवा नव्हती. नागपूर ते शिर्डी (Nagpur To Shirdi) दरम्यान एसटीची विना वातानुकूलित आसन ( सीटिंग) दररोज नागपुरातील गणेशपेठ बसस्थानकावरुन रात्री नऊ वाजता निघेल. तसेच सकाळी साडेपाच वाजता शिर्डी येथे पोहोचेल. तसेच शिर्डी येथून महामंडळाची बस रात्री नऊ वाजता निघून सकाळी 5.30 वाजता पोहोचेल.
नागपूर ते औरंगाबद सेवाही सुरु
याबरोबरच नागपूर ते औरंगाबाद (मार्गे जालना) या मार्गावरही समृद्धी महामार्गाद्वारे शयन आसनी बससेवा सूरू करण्यात आली आहे. सदरची बससेवा ही नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री 10.00 वाजता सुटेल व जालना मार्गे पहाटे 05.30 वाजता पोहोचेल. सदर बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात 50.09 कि.मी. व प्रवास वेळेमध्ये 4.40 तास इतकी बचत होणार आहे.
ही बातमी देखील वाचा...