एक्स्प्लोर

RSS Chief Mohan Bhagwat: असंतुलित प्रमाणात लोकसंख्या वाढ झाली की देशाची विभागणी होते; सरसंघचालकांचा इशारा

RSS Chief Mohan Bhagwat: पंथ, संप्रदायांच्या लोकसंख्येत असंतुलित प्रमाणात वाढ झाल्यास देशाची विभागणी होऊ शकते असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला.

RSS Chief Mohan Bhagwat: लोकसंख्येला देशावरील ओझं न समजता मनुष्यबळ म्हणून पाहिले पाहिजे असे प्रतिपादन करतानाच संप्रदाय, पंथांच्या लोकसंख्येत असंतुलित वाढ झाली की देश तुटतो असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी म्हटले. संघाच्या दसरा मेळाव्यात संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. 

नागपूर येथे झालेल्या संघाच्या पांरपरिक दसरा मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन करताना सरकारचे कौतुकही केले आहे. आपल्या भाषणात मोहन भागवत यांनी म्हटले की, जितकी लोकसंख्या असेल तितका त्याचा ताण असेल हे खरे आहे. पण, तीच लोकसंख्या मनुष्यबळ म्हणून वापरली तर त्याचा उपयोग होऊ शकतो. कोणत्याही देशात तरुणांची लोकसंख्या 57 कोटी नाही. चीनदेखील आता वयस्कर झाला असून भारत त्यांच्या तुलनेत तरुण असल्याचे भागवत यांनी म्हटले.  लोकसंख्या कमी झाली तर अनेक समाज आणि भाषा नष्ट होतात. त्याच वेळी, लोकसंख्या वाढ देखील संतुलित असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसंख्या वाढीचा असमतोल असेल, तर त्याचे काय परिणाम होतात, हे आपण 50 वर्षांपूर्वी अनुभवले आहे. लोकसंख्या वाढीत पंथ, संप्रदाय यांच्यातील देश तुटतो. त्यामुळे या असंतुलनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सरसंघचालकांनी म्हटले. लोकसंख्या नियंत्रणाबाबत धोरण तयार करण्याची आवश्यकता असून कोणालाही यातून विशेष सवलत अथवा त्यांना वगळता कामा नये असेही सरसंघचालकांनी आपल्या भाषणात म्हटले. 

सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले की, काहीजणांकडून भारताची प्रगती होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटकांकडून भारतातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सुरू असून भेदभाव वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. देशात दहशतवाद वाढावा, अराजकतेची स्थिती निर्माण आणि लोकांना कायद्याचा आदर वाटू नये अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत. असे प्रयत्न कोण करतोय हे सांगण्याची आवश्यकता नाही. सरकारकडून अशा लोकांवर कारवाई सुरू असून आपण सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे भागवत यांनी आपल्या भाषणात म्हटले. 

मातृभाषेत शिक्षण हवे

आपल्या शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षणात मातृभाषेचा समावेश करण्यात येत आहे. त्यानुसार, आता पाठ्यक्रम पुस्तके आणि शिक्षकदेखील तयार होत आहे. पण, आपण आपल्या पाल्यांना मातृभाषेतील शिक्षणासाठी पाठवतो का, असा सवाल भागवत यांनी यावेळी केला. करिअरसाठी इंग्रजीची आवश्यकता आहे, हे एक मिथक असून जर मातृभाषेतील शिक्षणासाठी आपण आपल्या मुलांना पाठवले नाही तर सरकारचे शैक्षणिक धोरण यशस्वी होऊ शकेल का, असेही त्यांनी म्हटले.

इंग्रजांनी भारतावर आपले शैक्षणिक धोरण लादले. त्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण घेऊन अनेक महापुरुषांनी इंग्रजांविरोधात संघर्ष केला. इंग्रजांविरोधात संघर्ष करण्याचा संस्कार त्यांना शैक्षणिक धोरणातून नव्हे तर समाज आणि कुटुंबातून मिळाले होते. त्यामुळे शिक्षणासोबत कुटुंब आणि समाजाचे संस्कारदेखील आवश्यक आहेत. 

सामाजिक समतेसाठी पुढाकार घ्या

मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात सामाजिक समतेचाही मुद्दा मांडला. भागवत यांनी म्हटले की, डॉ. आंबेडकर यांनी संविधानामुळे राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळतील. मात्र, सामाजिक स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करावे लागतील असे म्हटले होते. सामाजिक समानतेसाठी कायदे आहेत. मात्र, विषमता आपल्या मनात आहे. मनातील ही विषमता दूर सारण्याची आवश्यकता असून सगळ्यांनी त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे भागवत यांनी म्हटले. मंदिर, पाणवठा आणि स्मशानभूमी आदी सगळ्यांसाठी एकच असायला हवे, असे भागवत यांनी म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या

State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Maharashtra Weather Updates: नागपुरात मुसळधार, गोंदिया, भंडाऱ्यात धो धो; विदर्भात अचानक पावसाचा जोर का वाढला?, A टू Z अपडेट
नागपुरात मुसळधार, गोंदिया, भंडाऱ्यात धो धो; विदर्भात अचानक पावसाचा जोर का वाढला?, A टू Z अपडेट
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Embed widget