एक्स्प्लोर
राज्याच्या माजी पोलीस महासंचालकांच्या घरी चोरट्यांचा डल्ला
चक्रवर्ती यांच्या राहत्या घराच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर खासगी मंदिर आहे. या मंदिरातील सोन्याचं सगळं साहित्य चोरीला गेलयं.

नागपूर : नागपूरमध्ये चक्क माजी पोलीस महासंचालकांच्या घरावरच चोरट्यानं डल्ला मारलाय. राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या राहत्या घरातून चोरट्यांनी पूजेचं साहित्य लंपास केलं. प्रबीरकुमार चक्रवर्ती हे नागपूरच्या धरमपेठ परिसरात राहतात. यांच्या घरातल्या पुजाघरातून सोन्याचं मौल्यवान साहित्य चोरट्यांनी लांबवलं. रविवारी नियमित पुजेला येणाऱ्या पुजाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. चक्रवर्ती यांच्या राहत्या घराच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर खासगी मंदिर आहे. या मंदिरातील सोन्याचं सगळं साहित्य चोरीला गेलयं. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास करण्यास सुरुवात केली आहे. मात्र अद्यापपर्यंत चोराचा पत्ता लागू शकलेला नाही. खुद्द राज्याच्या माजी पोलीस महासंचालकांच्या घरी चोरी झाल्याने नागपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणावर आला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























