एक्स्प्लोर

Ram Temple Chandrakant Gundawar : कारसेवकाचा 30 वर्षांचा 'वनवास' श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठेनंतर संपणार; एका राम भक्ताच्या त्यागाची कहाणी!

राम मंदिरासाठी पादत्राणे त्याग करण्याचा निर्धार करणारे एक राम भक्त आहेत. जोपर्यंत राम मंदिर होणार नाही तोपर्यंत चप्पल परिधान करणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. चंद्रकांत गुंडावर असं या राम भक्ताचं नाव आहे.

Ram Temple Chandrakant Gundawar  : देशात सध्या राम मंदिराची चर्चा आहे. येत्या 22 जानेवारीच्या प्रभू श्रीरामाच्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी सगळेच आतुर आहेत. अनेक राम भक्तांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. यातच कारसेवाकांचीदेखील ईच्छा पूर्ण होत आहे. राम मंदिरासाठी पादत्राणे त्याग करण्याचा निर्धार करणारे एक राम भक्त आहेत. मागील 30 वर्षांपासून त्यांनी चप्पल परिधान केली नाही आहे. जोपर्यंत राम मंदिर होणार नाही तोपर्यंत चप्पल परिधान करणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. चंद्रकांत गुंडावर असं या राम भक्ताचं नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील या राम भक्ताने राम मंदिरासाठी मागील 30 वर्षांचा प्रवास अनवाणी पायाने केला आहे.

कारसेवकांना कष्टाचं फळ

चंद्रकांत गुंडावार हे मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात राहतात. ते निस्सिम रामभक्त आहेत. 1990 मध्य़े ते कारसेवेसाठी गेले होते. भाजप, विश्व हिन्दू परिषद आणि बजरंग दल या हिंदूत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येऊन भव्य कारसेवेचं आयोजन केलं होतं. लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रेचं नेतृत्व केलं होतं. यात हजारो तरुण या कारसेवेत सहभागी झाले होते. त्यावेळी कोठारी बंधूंनी बाबरी मशिदीवर भगवा फडकवला होता. या सगळ्या तणावपूर्ण वातावरणात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कोठारी बंधुंचा मृत्यू झाला. त्यानंतर 1992 मध्येदेखील कारसेवेची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा शेकडो कारसेवकांनी बाबरी मशिदीचा ढाचा उद्ध्वस्त केला. चंद्रकांत गुंडावर यांचादेखील या कारसेवकांंमध्ये समावेश होता. त्यावेळी राम जन्मभूमी स्थळावर भयंकर गोंधळ निर्माण झाला होता, असं ते सांगतात.

अन् अयोध्येतच सोडली चप्पल!


या कारसेवेच्या वेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्याच वेळी रामासाठी आपण महाराष्ट्रातून अयोध्येत आलो मात्र रामासाठी आपण अजून काय करु शकतो, याचा विचार करत असताना चंद्रकांत गुंडावार यांनी पादत्राणे त्याग करण्याचा निर्धार केला. 6 डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मशिदीचा ढाचा उद्ध्वस्त केल्यानंतर जोपर्यंत राम मंदिराची स्थापना होत नाही किंवा त्यासंदर्भात ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निश्चय केला आणि अयोध्येतच चप्पल सोडून घरी परतले. त्या दिवसापासून आजपर्यंत म्हणजे गेली 30 वर्ष त्यांनी चप्पल परिधान केली नाही.

कुटुंबियांचा मोठा पाठिंबा...


गुंडावार कुटुंब हे गावातील प्रतिष्ठित कुटुंब मानलं जातं. मागील अनेक वर्षांपासून त्याचं कुटुंब सामाजिक कार्य करतात. पायात चप्पल नसल्याने त्यांना अनेकांनी नावं ठेवले असतील मात्र त्यांनी या टीकेला कधीही उत्तर दिलं नाही. अयोध्येत चप्पल त्याग करुन आल्यावर त्यांनी हा निर्णय कुटुंबियांना सांगितला. तेव्हा कुटुंबियांनी कोणताही आक्षेप न घेता त्यांचा निर्णय मान्य केला आणि निर्धार पूर्ण करण्यासाठी त्यांना कायम मदत केली. पायाला झालेल्या जखमा पाहून कुटुंब अनेकदा खचून जायचे मात्र त्यांना धीर देण्यासाठी ते कायम सक्षमदेखील असायचे. कुटुंबियांनी दिलेल्या साथीमुळे मी हा निर्धार पूर्ण करु शकलो, असं चंद्रकांत गुंडावार सांगतात.


अनवाणी पायांनी केला 30 वर्षांचा प्रवास...


6 डिसेंबर1992 पासून त्यांचा अनवाणी पायाने प्रवास सुरु झाला. घरातील लग्न समारंभ, ऊन, वारा पावसात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी निर्धार सोडला नाही. चंद्रपूर जिल्हा हा सर्वात उष्ण जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याकाळात चालताना अनेकदा निर्धार सोडण्याचा विचार त्यांच्या मनात आला मात्र त्यांनी निर्धार कायम ठेवला. उन्हातान्हात अनवाणी पायाने ते आजही अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतात. शेतात काम करताना त्यांच्या पायाला अनेकदा काटे टोचले मात्र ते मागे हटले नाहीत.
 

मंत्री मुनगंटीवार यांनी दिली कोल्हापूरी चप्पल..


5ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यानंतर त्यांनी आता चप्पल परिधान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मोठा सोहळा आयोजित करुन त्यांना चप्पल देण्यात येणार होती. मात्र ही सगळी कहाणी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना समजली. त्यावेळी ते अवाक झाले होते. पक्षाचा किंवा जिल्ह्यात मोठा कार्यक्रम घेऊ आणि त्यात गुंडावार यांची प्रेरणादायी कहाणी अनेकांपर्यंत पोहचवू असं त्यांनी सांगितलं होतं. ज्यावेळी राम मंदिरासाठी गडचिरोली येथील लाकूड पाठवण्यात आले. चंद्रपूर ते बल्लारपूर या दोन शहरांमध्ये सगळं वातावरण राममय झालं होतं. यावेळी काष्ठ पुजेचं आयोजन करण्यात आलं होतं. सगळीकडे रामनामाचा जयघोष सुरु होता. याच कार्यक्रमात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कोल्हापूरी चप्पल देऊन  चंद्रकांत गुंडावार यांचा निर्धार पूर्ण केला.

 

अयोध्येचं दर्शन घेऊन निर्धार सोडणार...

चंद्रकांत गुंडावार सांगतात, 'आज माझा 30 वर्षांचा निश्चय पूर्ण झाला आहे. त्यात माझं कुटुंबिय माझ्या सोबत आहे. मला कोल्हापूरी चप्पल मंत्री मुनगंटीवार यांनी दिली मात्र मी अयोध्येत जाऊन राम मंदिराचं दर्शन घेणार आणि अयोध्येतच ती चप्पल परिधान करणार', असं त्यांनी सांगितलं आहे. राम मंदिराचा सोहळा पार पडला की हे रामाचं दर्शन घेणार आणि त्यानंतर चप्पल परिधान करणार आहेत.

इतर महत्वाची बातमी-

22 जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 'हाफ डे'; दुपारी अडीचपर्यंत सुट्टी, भावना आणि विनंत्यांचा मान ठेवत मोठा निर्णय

 
 
 
 
 
 
 
शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

व्हिडीओ

Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
Nashik News: लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
Winter Session: अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी
अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
Maharashtra Flood Aid: शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
Embed widget