एक्स्प्लोर

Samruddhi Highway : समृद्धी महामार्ग उद्घाटनासाठी तयार; झिरो अॅक्सिडेंटल कॉरिडोरची निर्मिती

नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या महामार्गाचे काम केवळ 4 वर्षात पूर्ण झाले आहे. आता 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर समृध्दी महामार्ग वाहतूकीसाठी सुरू होणार आहे.

Nagpur News : उपराजधानी नागपूर ते आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या 701 किमीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या (समृद्धी महामार्ग) पहिल्या टप्प्यातील नागपूर-शिर्डी या 521 किमी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 11 डिसेंबरला होत आहे. तर शिर्डी ते मुंबई दरम्यानच्या 181 किमीचे उर्वरित महामार्गाचे काम 15 जुलै 2023 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सुरळीत वाहतूक व्यवस्थेसोबत झिरो अॅक्सिडेंटल कॉरिडोर असणारा हा समृद्धी महामार्ग देशातील पहिलाच महामार्ग ठरणार आहे. 

उद्घाटनाची जय्यत तयारी

नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या महामार्गाचे काम केवळ 4 वर्षात पूर्ण झाले आहे. आता 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरु होणार आहे. समृद्धी महामार्गावर दररोज 25 हजार प्रवासी गाड्यांची वाहतूक होण्याची अपेक्षा आहे. उद्घाटन कार्यक्रमाची जय्यत तयारी मिहानच्या एम्स परिसरात केल्या जात आहे. 

8 शहरे पहिल्या टप्पात 

वैशिष्ट्य पूर्ण असा समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) ग्रीन फिल्ड कॉरिडोर तयार करुन महामार्गाच्या दोन्ही बाजूने जवळपास 11 लाख झाडे लावण्यात येत आहे. तसेच 22 लाख विविध फुलझाडांचे रोपटे आणि फुलांच्या वेली लावल्या जात आहेत. समृद्धी महामार्गालगत नवीन 18 आधुनिक शहरे वसवली जाणार आहेत. यातील 8 शहरे पहिल्या टप्पात तयार करण्याचे नियोजन आहे. 20 फुड प्लाझा, 24 पेट्रोल पंप असतील, यातील शिर्डी येथील पेट्रोल पंप सुरु करण्यात आला आहे. याशिवाय कृषी समृद्धी केंद्र उभारण्याचे ठरले असून यामुळे शेतकरी ग्राहक समृद्धी सोबत जोडले जाणार आहेत. कृषी आधारित अर्थव्यवस्था यामुळे मजबूत होणार आहे. इंडस्ट्रिअल हब, लॉजिस्टिक हब, निवासी संकुले, टुरिझम हब, आयटी हब हे समृद्धीचे वैशिष्ट्ये ठरणार आहेत. 

प्रवासाचा वेळ कमी होणार 

मुख्यत: सध्या स्थितीत नागपूर ते मुंबई हे अंतर रस्ते मार्गाने जाण्यासाठी 14 तास लागतात. 701 किमीचा समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हेच अंतर 8 तासात पूर्ण करता येणार आहे. नागपूर आणि मुंबईचे अंतर कमी होणार असून प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. संपूर्ण समृद्धी महामार्ग आंतरराष्ट्रीय मानकांनुसार उभारण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा विदर्भ, मराठवाड्याच्या विकासाला आणि वाहतूक, दळणवळण, उद्योग, व्यापाराला चालना देणारा आहे.

वेग मर्यादा 150 किमी प्रति तास

नागपूरच्या हिंगणा-वायफळ या झिरो माईलपासून सुरु होणारा हा समृद्धी महामार्ग मुंबईच्या जवाहरलाल नेहरु बंदरपर्यंत जोडणारा आहे. मालवाहतुकीसाठी हा महामार्ग वेळ आणि वाहतुकीचा खर्च वाचवणारा ठरणार आहे. जवळपास 26 तालुके आणि 392 गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे. समृद्धी महामार्गामुळे काही महत्वाचे राष्ट्रीय महामार्गही जोडले जाणार आहेत. समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा 150 किमी प्रति तास आहे. जर भविष्यात परत महामार्गात वाढ करायची झाल्यास ती तरतूद आताच करण्यात आली आहे.

झिरो अॅक्सिडेंटल कॉरिडोर

समृद्धी महामार्गाच्या दोन्हीही बाजूस सर्विस रोड असून उड्डाणपूल, 25 ठिकाणी इंटरचेंजेस तसेच 7 बोगदे तयार करण्यात आले आहे. सुरळीत वाहतूक व्यवस्थेसोबत झिरो अॅक्सिडेंटल कॉरिडोर असणारा हा समृद्धी महामार्ग देशातील पहिलाच महामार्ग ठरणार आहे. या महामार्गाच्या लगत गॅस पाईपलाईन, इलेक्ट्रिक लाईन तसेच आप्टिकल फायबर केबलसाठी जागा सोडण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती दरम्यान महामार्गावर विमान उतरु शकेल असा रन-वे हे समृद्धीचे एक वैशिष्टे आहे.

नागपूर - गोंदिया नवीन 'एक्स्प्रेस वे'

समृद्धी महामार्गानंतर (Hindu Hridaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) आता 135 किमीचा नागपूर ते गोंदिया आणि नागपूर ते गडचिरोली असा नवा 'एक्स्प्रेस वे' बांधला जाईल. एक्स्प्रेसवेचा डीपीआर तयार करण्यासाठी कन्सलटंट नियुक्त करण्यात आला आहे. या महामार्गासाठी जानेवारी 2023 मध्ये अधिसूचना जारी केली जाईल. समृद्धीसाठी झालेल्या उत्खननावर विविध तहसीलदारांनी ठोठावलेला 1200 कोटींचा दंड राज्य सरकारने रद्द केला आहे. समृद्धी महामार्गाला समांतर नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन चालविण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनसोबत राज्य सरकार हा प्रकल्प करण्यास तयार आहे. पवनार ते पाताळदेवी पर्यंत नागपूर-गोवा हा 'एक्स्प्रेस वे' बांधल्या जाणार आहे. या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यासाठी नव्या वर्षात निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती आहे.

ही बातमी देखील वाचा

Nagpur News : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 11 डिसेंबरला नागपूर दौरा, मेट्रोतून प्रवास करण्याची शक्यता, प्रशासन लागले कामाला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BJP : भाजपकडून अकोल्यातील 11 बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
भाजपकडून अकोल्यातील 11 बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
Walmik Karad: वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही
वाल्मीक कराडसमोर सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही, गेल्या 24 तासांत काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Babanrao Taywade on Dhananjay Munde : मुंडेंना टार्गेट केल्यास आम्ही आंदोलन करू;तायवाडेंचा थेट इशाराLNG MSRTC : ST महामंडळाला LNG पुरवणाऱ्या कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रारRatnagiri Beach Zipline : आरे वारे बीचवर झीप लाईनचा विहंगम थरार, समुद्राची नयनरम्य दृश्यTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 30 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP : भाजपकडून अकोल्यातील 11 बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
भाजपकडून अकोल्यातील 11 बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
Walmik Karad: वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही
वाल्मीक कराडसमोर सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही, गेल्या 24 तासांत काय घडलं?
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
Walmik Karad: फरार वाल्मिक कराड पोलिसांच्या अंगरक्षरकांना घेऊन महाकालाच्या दर्शनाला? 'ते' फोटो समोर
वाल्मीक कराडचं शेवटचं मोबाईल लोकेशन सापडलं, संकटकाळी देवाच्या दारी, मुक्काम नेमका कुठे?
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
Team India WTC Final Scenario : मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
Embed widget