एक्स्प्लोर

KCR Nagpur Visit : ऑरेंज सिटी नागपूर बनली पिंक सिटी; केसीआर यांच्या दौऱ्यानिमित्त ठिकठिकाणी बीआरएसचे झेंडे, बॅनर्स आणि पोस्टर्स

KCR Nagpur Visit : ऑरेंज सिटी अशी ओळख असलेले नागपूर आज पिंक सिटी झाली आहे. त्याला कारण ठरला आहे भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा नागपूरचा अवघ्या पाच तासांच्या दौरा.

KCR Nagpur Visit : ऑरेंज सिटी (Orange City) अशी ओळख असलेले नागपूर (Nagpur) आज (15 जून) पिंक सिटी (Pink City) झाली आहे. त्याला कारण ठरला आहे भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष (BRS) आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांचा नागपूरचा अवघ्या पाच तासांच्या दौरा. केसीआरच्या या पाच तासांच्या दौऱ्यासाठी भारत राष्ट्र समितीने नागपुरात जय्यत तयारी केली आहे. ठिकठिकाणी पक्षाचे झेंडे, बॅनर, पोस्टर्स लावण्यात आले असून त्याच्या माध्यमातून तेलंगणा सरकारच्या विविध योजना आणि त्यांची माहिती महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडण्यात आली आहे.

कसा आहे केसीआर यांचा नागपूर दौरा?

दुपारी एक वाजताच्या सुमारास केसीआर यांचा नागपुरात आगमन होईल. त्यानंतर ते लगेचच विवेकानंद नगर परिसरात बीआरएसच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. सकाळपासूनच या कार्यालयात तेलंगणामधून आलेल्या पुरोहितांकडून खास पूजा केली जात आहे. कार्यालयाचा उद्घाटन केल्यानंतर केसीआर सुरेश भट सभागृहात बीआरएसच्या मेळाव्याला संबोधित करतील. या मेळाव्यात विविध पक्षातील आणि संघटनेतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने बीआरएसमध्ये प्रवेश करतील असा दावा पक्षाकडून केला जात आहे. असे असले तरी सध्या तरी कुठल्याही मोठ्या नेत्याचा नाव बीआरएसमध्ये प्रवेशासाठी समोर आलेला नाही. मेळाव्यानंतर केसीआर चार वाजताच्या सुमारास नागपुरात पत्रकार परिषदही घेणार आहेत. 

बीआरएसकडून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तेलंगणा सरकारच्या योजनांची माहिती 

महाराष्ट्राच्या राजकारणावर सध्या बीआरएसने लक्ष केंद्रित केलं असून मराठवाड्यानंतर बीआरएस आता विदर्भावर लक्ष केंद्रित करत आहे. बीआरएसने शेतकऱ्यांना आपल्या प्रचारमोहिमेत लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बीआरएसला कसा प्रतिसाद मिळतो, हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी तेलंगणा सरकारच्या विविध योजनांची माहिती महाराष्ट्रातील ग्रामीण भागात देऊन बीआरएस हा पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना सर्वच पक्षांच्या व्होट बँकमध्ये मोठी गळती लावण्याच्या तयारीत आहे.

बीआरएसकडून पंढरपुरात फलक

चार दिवसांपूर्वी बीआरएस पक्षाने आषाढी यात्रेला येणाऱ्या लाखो विठ्ठलभक्तांचे लक्ष वेधून घेण्यासाठी पंढरपूर शहरातील मुख्य रस्त्यांवर वारकऱ्यांच्या स्वागताचे आणि प्रचाराचे मोठमोठे फलक लावले आहेत. आषाढी यात्रेला जवळपास 20 लाख भाविक एकाच गावात एकत्र येत असल्याने याचा फायदा घेण्याचा प्रयत्न बीआरएसच्या टीमकडून केला जात आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांचे भले मोठे बॅनर लक्ष वेधून घेत आहे. 

हेही वाचा

Ghanshyam Shelar Joins BRS : अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, घनश्याम शेलार यांचा बीआरएसमध्ये प्रवेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
Vipul Kadam: श्रीकांत शिंदेंचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार, वर्षावरची खलबतं संपताच विपुल कदम कामाला लागले
बातमी फुटताच श्रीकांत शिंदेंचा मेहुणा कामाला लागला, गुहागर विधानसभेची उमेदवारी पक्की?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
One Nation One Election : केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aashish Hemrajani : Book My Showचे सीईओ आशिष हेमराजानी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीलाABP Majha Headlines :  12 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPhaltan : सोळशीच्या कार्यक्रमात अजित पवारांनी फोनवरून केली उमेगवारीची घोषणाGovernment Employees :सेवानिवृत्ती उपदान 14 लाखांवरून  20 लाख करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
Vipul Kadam: श्रीकांत शिंदेंचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार, वर्षावरची खलबतं संपताच विपुल कदम कामाला लागले
बातमी फुटताच श्रीकांत शिंदेंचा मेहुणा कामाला लागला, गुहागर विधानसभेची उमेदवारी पक्की?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
One Nation One Election : केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
Ramdas Athawale : महायुतीचं जागावाटपासाठी बैठकांचं सत्र, रामदास आठवलेंनी आरपीआयचा दोन अंकी आकडा सांगितला, भाजपकडे यादी सोपवली
महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच रामदास आठवलेंनी बावनकुळेंकडे यादी सोपवली, बच्चू कडूंना म्हणाले...
Ajit Pawar : अजित पवारांची स्मार्ट खेळी,फोनवरुन दीपक चव्हाणांची उमेदवारी जाहीर, रामराजे खुदकन हसले, कारण...
अजित पवारांची स्मार्ट खेळी, भरसभेत फोनवरुन दीपक चव्हाणांना उमेदवारी, रामराजेंचा मूड बदलला
Sanjay Raut :शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
Mammootty Net Worth: 'साऊथचे अंबानी' म्हणून ओळखले जातात 'मामूटी'; 100 कोटींच्या फक्त कार, इतर संपत्तीची बातच और... टोटल नेटवर्थ किती?
'साऊथचे अंबानी' सिनेस्टार 'मामूटी'; 100 कोटींच्या फक्त कार, इतर संपत्तीची बातच और... टोटल नेटवर्थ किती?
Embed widget