एक्स्प्लोर

Diwali 2022 : मातीच्या फॅन्सी दिव्यांनी बाजारपेठा सजल्या; यंदा मातीच्या झुमरचा बोलबाला

यंदा दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत असल्याने ग्राहकांसोबतच बाजारातही उत्साह दिसून येत आहे. तसेच बाजारपेठही आकर्षक दिवे, आकाश कंदील, लायटिंग, रांगोळी आदींनी सजले आहे.

Nagpur News : कोरोनानंतर प्रथमच निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात येत असल्याने ग्राहकामंध्ये खरेदीचा चांगला उत्साह बघण्यास मिळत आहे. यासाठी शहरातील बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत. दिवाळीच्या (Diwali 2022) सणात लायटिंगसाठी अनेक नागरिक रंगबिरंगी विद्युत माळा आणि लाईटचे इतर उपकरणांचा वापर करतात, पण आजही मातीच्या दिव्याचे महत्त्व कमी नाही झाले. बदलत्या फॅशनच्या जमान्यात कुंभारांनीही आपली कला बदलून मातीच्या दिव्यांना फॅन्सी लूक दिला आहे. यासह आर्टिफिशियल फुलांचे तोरणांनाही ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे.

टेराकोटा रंगाने बनलेल्या दिव्यांना रंगबिरंगी रंगासोबत विविध प्रकारच्या आकर्षक खड्यांनी सजविले आहे. दिव्यांच्या डिझाईनमध्ये आता बराच बदल झाला आहे. यासोबतच यंदा बाजारात मातीच्या घंट्यांच्या झुमरलाही ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. यावेळी बहुतांश लोकांना दिव्यांमध्ये कमळ, हात, सूप, झोपडीसारखे, कंदील, चौकोनी, पान, हार्ट, स्वस्तिक, शंख, गणेश आणि फुले यांसारख्या कोरलेल्या सोनेरी रंगाच्या दिव्यांकडे आकर्षित करत आहे. रंगीबेरंगी दिव्यांच्या किमती 25 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत आहे. तर साधे आणि हलके डिझाइन असलेले दिवे 30 ते 50 रुपये डझनने विकले जात आहेत. आर्टिफिशियल फुलांच्या तोरणांच्या कच्च्या मालाच्या दरातही वाढ झाली असल्याने यंदा तोरणांचे दरही 20 टक्क्यांनी वाढले असल्याचे आझम खान यांनी सांगितले. सध्या आर्टिफिशियल फुलांचे तोरण 350 पासून 3000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

पूजेसाठी मातीची थाळी

हनुमाननगर परिसरातील व्यापारी नंदू जैस्वाल यांनी यावेळी सांगितले की, दिवाळीच्या मुहूर्तावर एकीकडे मातीपासून बनवलेल्या दिव्याला लोक पसंती देत ​​आहेत, तर दुसरीकडे मातीपासून बनवलेल्या पूजेच्या थाळीलाही लोकांची पसंती आहे. गणेशाच्या आकाराची थाळीही लोकांना खूप आवडते. या दिवाळीला लोक लक्ष्मी-गणेशाची पूजा मातीच्या दिव्यांसोबत मातीच्या ताटात करतील. यासोबतच घराची सजावट करण्यासाठी 9 मुखी आणि 21 मुखी दिव्यांना घरी सजविण्यासाठी खरेदी करत आहेत. त्यांची किंमत 200 ते 500 रुपयांपर्यंत आहे. लोकांच्या आवडीनुसार हे दिवे बनवले जातात. लोकांच्या मागणीनुसार 9 मुखी आणि 21 मुखी दिव्यांना लक्ष्मी आणि गणेशाची मूर्तीही बनवण्यात आली आहे.

माती, मेणबत्तीचे दिवे

यावेळी मातीच्या डिझाईनचे दिव्यांमध्ये रंगबिरंगी मेणबत्ती भरलेली आहे, जी खरेदी करणाऱ्यांना भूरळ पाडत आहे. लोकं या दिव्यांची देखील मागणी करत आहे. यांची किंमत 30 ते 60 रूपया पर्यंत आहे. ते खुल्यासोबत डझन आणि अर्धा डझनच्या पॅकिंगमध्येही येत आहे. घराच्या सजावटीत भर घालत असलेल्या नव-नव्या डिझाईनमुळे या मेणाच्या दिव्यांची क्रेझ नागपूरकरांमध्ये वाढली आहे.

वेगवेगळ्या प्रकारे दिव्यांच दर

  • कलर केलेले दिवे 20 रुपये नग
  • कलर स्टोनचे दिवे 25 रुपये नग
  • गणेशमूर्तीचे दिवे 50-70 रुपये
  • स्टॅण्ड दिवे 35-40 रुपये
  • 9 मुखी दिवे 200 रुपये
  • 21 मुखी दिवे 350 रुपये

मातीच्या घंट्यांचे आकर्षक झुमर

Diwali 2022 : मातीच्या फॅन्सी दिव्यांनी बाजारपेठा सजल्या; यंदा मातीच्या झुमरचा बोलबाला

मातीच्या झुमरचे दर त्यामध्ये वापरलेल्या घंट्यांमधून लावण्यात येतात. यामध्ये साधारणतः 5 घंट्यांपासून तर 21 घंट्यांपर्यंतचे आकर्षक झुमर सध्या बाजारात चलनात आहेत. यामध्ये 15, 18 आणि 21 घंट्यांच्या झुमरची चांगली मागणी आहे. 15 घंट्यांचा झूमर 300 ते 380 दरम्यान उपलब्ध आहे. तर 18 घंट्यांचा 450 आणि 21 घंट्यांचा झुमर 550 रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याचे अशोक चौक परिसरातील विक्रेता सोनू सय्यद अली यांनी सांगितले.

मूर्तींचाही बाजार हॉट

Diwali 2022 : मातीच्या फॅन्सी दिव्यांनी बाजारपेठा सजल्या; यंदा मातीच्या झुमरचा बोलबाला

मातीचे दिवे, झूमर, ताट यासह विविध आकर्षक 'शो पिस' म्हणून मातीच्या मूर्तींचीही मागणी चांगलीच वाढली आहे. यात हत्ती, महिलेची मूर्ती, लक्ष्मी मातेची मूर्ती, फ्लॉवर पॉट आदी उपलब्ध आहेत. आकारानुसार याचे दर असून 180 रुपयांपासून तर तब्बल 2400 रुपयांपर्यंत या मातीच्या मूर्ती उपलब्ध आहेत.

इतर महत्त्वाची बातमी

Elon Musk : एलॉन मस्क यांची ट्विटर डील शेवटच्या टप्प्यात, 75 टक्के Twitter कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रियाVinod Tawde Virar : विरारमध्ये तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; राजन नाईक, क्षितीज ठाकूरांमध्ये वादHitendra Thakur On Vinod Tawde : 'भाजपवाल्यांनीच सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत'Uddhav Thackeray : भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट राज्यातून संपू दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
Vinod Thakur: विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूरांची बाचाबाची, डायरी दाखवली, कार्यकर्ते म्हणाले, लाईट का बंद केली?
विनोद तावडेंनी गळ्याला हात लावून शपथ घेतली, क्षितिज ठाकूरांनी डायरी दाखवली, विरारमध्ये राडा
Vinod Tawde: माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
Embed widget