Petrol Price: आता 50 रुपयांपेक्षा कमी पैसे असतील तर पेट्रोल मिळणार नाहीत, पंपमालकाने लावली नोटीस
Nagpur: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील एका पेट्रोल पंपाने 50 रुपयांपेक्षा कमी किमतीचे पेट्रोल विकण्यास नकार दिला आहे.
Nagpur: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील एका पेट्रोल पंपाने 50 रुपयांपेक्षा कमी किमतीचे पेट्रोल विकण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात एक पोस्टरही चिकटवण्यात आले असून, त्यावर पन्नास रुपयांच्या खाली पेट्रोल मिळणार नाही, असे स्पष्ट लिहिले आहे.
या निर्णयाबाबत पेट्रोलपंप मालक रविशंकर पारधी यांचे म्हणणे आहे की, वाहनचालक 20-30 रुपयांचे पेट्रोल मागतात आणि तेथे असलेली मशिन वेगाने चालते. कामगार जेव्हा नोझल उचलतो तेव्हा काही सेकंदातच 20-30 रुपयांचे पेट्रोल टाकून होते. अशातच लोकांना आपण दिलेल्या किंमती इतके पेट्रोल दिले नसून आपली फसवणूक होत आहे, या भावनेतून लोक भांडतात. म्हणून आता वीज वाचवण्यासाठी आणि भांडणे टाळण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले. तर दुसरीकडे गाडीत तेल भरण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाने सांगितले की, 50 रुपयांच्या खाली पेट्रोल मिळत नसेल तर आमचे काम कसे चालेल. त्याचप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत.
विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ददरोज होणारी वाढ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दरम्यान, मुंबईत (Petrol Diesel Price ) आता पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. मुंबईशिवाय राजस्थानच्या श्री गंगानगर आणि मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात पेट्रोलच्या दराने 120 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. राज्य स्तरावर वाहनांच्या इंधनावरील व्हॅटच्या वेगवेगळ्या दरांमुळे, शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगळे आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
CNG Price Hike : महागाईचा ट्रिपल अटॅक; पेट्रोल-डिझेलपाठोपाठ CNG दरांमध्येही वाढ
पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले, आज पुन्हा वाढ, 16 दिवसांतील चौदावी दरवाढ, एक लिटरचे दर काय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha