एक्स्प्लोर

Nagpur News : सना खान प्रकरणात मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार संजय शर्मा यांना चौकशीसाठी नोटीस, मात्र शर्मा आज हजर राहणार नाहीत!

Sana Khan Case : सना खान यांच्या हत्या प्रकरणात आज नागपूर पोलिसांनी मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार संजय शर्मा यांना चौकशीसाठी नागपुरात बोलावले आहे.

नागपूर : सना खान (Sana Khan) यांच्या हत्या प्रकरणात आज नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार संजय शर्मा (Sanjay Sharma) यांना चौकशीसाठी नागपुरात बोलावले आहे. नागपूर पोलिसांनी त्यांना त्या संदर्भात नोटीसही दिली आहे. मात्र आमदार संजय शर्मा आज चौकशीसाठी येणार नसल्याची खात्रीलायक माहिती आहे. मतदारसंघात काही काम असल्याने आज नागपुरात येणे शक्य नसल्याचे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळवले आहे.

सना खान यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी अमित साहू आमदार संजय शर्मा यांच्याशी संबंधित असल्याचे बोलले जाते. जबलपूर परिसरात अमित साहू त्यांचा समर्थक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सना खान प्रकरणाशी संबंधित काही माहिती आमदार संजय शर्मा यांच्याकडे आहे का? तसेच दोन ऑगस्टला सना खान यांची हत्या केल्यानंतर अमित साहू त्यांच्या आश्रयाला होता का? याची चौकशी करण्यासाठीच नागपूर पोलिसांनी आमदार शर्मा यांना नागपुरात बोलावले आहे.

मतदारसंघातील कामांमुळे चौकशीसाठी नागपुरात येणे अशक्य : आमदार संजय शर्मा 

नागपूरमधील भाजप नेत्या सना खान यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणाचा पूर्णपणे उलगडा झालेला नाही. मात्र, या प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे. सना खान यांच्या हत्येनंतर अमित साहू ज्या ज्या लोकांच्या संपर्कात आला होता त्यांची माहिती पोलिसांनी काढली आहे. त्यापैकी काही लोकांनी अमित साहूला आश्रय दिले होते आणि त्याच अनुषंगाने मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार संजय शर्मा यांना चौकशीसाठी बोलावल्याचे पोलीस उपायुक्त राहुल मदने म्हणाले. मात्र आज तरी आमदार संजय शर्मा यांनी पोलिसांच्या चौकशीकडे पाठ फिरवली असून मतदारसंघाच्या कामांमुळे नागपुरात येणे शक्य नसल्याचे कळवले आहे.

हनी ट्रॅपचा आरोप

सना खान अपहरण आणि हत्या प्रकरणाचा पूर्णपणे उलगडा झालेला नाही. मात्र, आता त्याच प्रकरणात हनी ट्रॅपचा नवा आरोप समोर आला आहे.  नागपूर पोलिसांनी सना खान यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी अमित साहू आणि त्याच्या काही अज्ञात सहकाऱ्यांच्या विरोधात नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवत हनी ट्रॅप केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, हनी ट्रॅपच्या प्रकरणात आरोपींनी सना खान यांचा वापर केला की नाही हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. अमित साहू आणि त्याचे सहकारी पीडित महिलेला काही लोकांकडे पाठवून त्यांच्या संबांधाचे व्हिडीओ बनवून खंडणी वसूल करत होते, अशी तक्रार आपल्याकडे आली, त्यानंतर आपण या प्रकरणी तपास करून हनी ट्रॅप प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

Nagpur Crime : सना खान प्रकरणात हनी ट्रॅपचा अँगल, अमित साहूसह त्याच्या नागपूर आणि जबलपूरमधील सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...Praful Patel Shirdi :  धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोललेNana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही,  गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोलेSaif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Embed widget