एक्स्प्लोर
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर नागपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज पहाटे उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर नागपुरातल्या अंबाझरी घाटावर दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1927 रोजी मध्य प्रदेशमधील रायपूर येथे झाला. स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी सहभाग घेतला होता. न्यायदानात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमधील त्यांचे निर्णय दिशादर्शक ठरले.
चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी हिंदी, मराठी आणि गुजराती भाषेत पुस्तकं लिहिलं. उत्कृष्ट कार्यासाठी धर्माधिकारी यांना 2003 मध्ये भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर नागपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज पहाटे उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं प्रकाशित साहित्य
अंत्ययात्रा
काळाची पाऊले
न्यायमूर्ती का हलफनामा (हिंदी)
भारतीय संविधानाचे अधिष्ठान
मंझिल दूरच राहिली!
माणूसनामा
मानवनिष्ठ अध्यात्म
लोकतंत्र एवं राहों के अन्वेषण (हिंदी)
शोध गांधींचा
समाजमन
सहप्रवास
सूर्योदयाची वाट पाहूया
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement