Agriculture : शेतकरी सन्मान योजनेला महसूल कर्मचाऱ्यांचा असहकार
आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवून त्यांच्या खात्यात जमा निधी वसूल करण्याचे आदेश आले. याची जबाबदारी महसूल विभागाला दिली. शेतकऱ्यांचा सातबारा, खाते क्रमांक गोळा करण्याचे काम महसूल विभागाने केले.
नागपूरः केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची कामे करण्यास महसूल कर्मचाऱ्यांना असहकाराचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे योजनेवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू केली. यात शेतकऱ्यांना तीन टप्प्यात सहा हजार रुपये देण्यात येते.
प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येते. अनेकदा पंतप्रधानांनी (PM) स्वतःच रक्कम वळती करण्याबाबत माहिती दिली. आतापर्यंत निधी देण्याचे जवळपास 11 हप्ते झाले. 26 लाख 30 हजार 286 लाभार्थी खातेदारांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. नंतर काही सुधारणा योजनेत करण्यात आल्या. त्यात काही निकष लावण्यात आले. आयकर भरणारे (Income Tax) शेतकरी यातून वगळण्यात आले. अशा शेतकऱ्यांना (Farmer) अपात्र ठरवून त्यांच्या खात्यात जमा केलेला निधी वसूल करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले. त्याची जबाबदारी महसूल विभागावर टाकण्यात आली. शेतकऱ्यांचा सातबारा, खाते क्रमांक गोळा करण्याचे काम महसूल विभागाने केले.
या योजनेवर येणाऱ्या एकूण खर्चाची 0.25 टक्के रक्कम काम करणाऱ्यांना मिळणार होती. परंतु ही मिळाली नाही. शिवाय ग्रामविकास व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून हातवर करण्यात आलेत. त्यामुळे आता महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनीही या कामास असहकार करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
थोडक्यात...
- 7 हजार 130 शेतकरी अपात्र
- 6 कोटी 24 लाख 34 हजार रुपये वसूल
- 1971 शेतकऱ्यांकडून 1 कोटी 79 लाख 4 हजार रुपये वसूल करण्यात आले.
पटवारी म्हणतात...
ग्रामविकास व कृषी विभागाने डेटा नसल्याचे कारण पटण्यासारखे नाही. सर्व मेहनत महसूल विभागाची असतानाही देण्यात आले. या योजनेचे काम करण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार होते. ते अद्याप मिळाले नाही. त्यामुळे पटवारींकडून कामाला असहकार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी म्हणतात...
कर्मचारी काम करीत नाहीत. त्यामुळे इतरांना ते काम विभागून दिले असल्याची प्रतिक्रीया जिल्हाधिकारी आर.विमला यांनी दिली.
Azadi Ka Amrit Mahotsav : आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक तिरंगा हा प्रत्येक घरावर लागलाच पाहिजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरकरांना आवाहन
जी.डी.सी. अँड ए व सी.एच.एम. परीक्षेचे गुणपत्रक उपलब्ध
नागपूर : सहकार खात्यामार्फत 2020 मध्ये घेण्यात आलेल्या जी.डी.सी. अँड ए व सी.एच.एम. परीक्षा निकाल जाहीर झालेला आहे. या परीक्षेत नागपूर केंद्रावरील उत्तीर्ण व अनुतीर्ण झालेल्या परीक्षार्थीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भूविकास बँक कॉम्प्लेक्स, गणेशपेठ, नागपूर या कार्यालयात 1 ते 30 ऑगस्ट या कालावधीत काया्रलयीन वेळेत वाटप करण्यात येणार आहे. उत्तीर्ण व अनुत्तीर्ण परीक्षार्थींनी गुणपत्रक व प्रमाणपत्र कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावे, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था गौतम वालदे यांनी कळविले आहे.