एक्स्प्लोर

Swine Flu : नागपूरला 5000 इन्फल्यूएंझा लसमात्रा प्राप्त : अतिजोखमीच्या व्यक्तींनाच लस

स्वाईन फ्लूपासून संरक्षणासाठी लसीकरणाला सुरूवात झाली आहे. सुरूवातीला अतिजोखमीच्या व्यक्तींनाच लस देण्यात येईल. अधीक माहितीकरीता 9175414355 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क करावा. 

नागपूर : कोव्हिड रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच नागपूर शहरात इन्फल्युएंझा A (H1N1) किंवा स्वाईन फ्लू या आजाराचे सुद्धा रुग्ण वाढत आहेत. यावर प्रतिबंधासाठी शहरात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला सुरूवात केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सेवा संचालनालयाद्वारे नागपूरला 5000 इन्फल्युएंझा लसमात्रा प्राप्त झालेल्या आहेत. ही लस सध्या अतिजोखमीच्या व्यक्तींना देण्यात येणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार लवकरच शहरात लसीकरण मोहिम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती साथरोग विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी दिली आहे.

नागपूर शहरामध्ये स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या सतत वाढत आहे. याशिवाय शहरात स्वाईन फ्लू बाधित चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये एक स्त्री व तीन पुरूष आहेत. मृतकांमध्ये तिघे नागपूर शहरातील आहेत तर एक शहराबाहेरील असल्याची नोंद आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूपासून संरक्षणासाठी शासनाद्वारे प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात करण्यात येत आहे. सुरूवातीला अतिजोखमीच्या व्यक्तींनाच लस देण्यात येणार आहे. अधीक माहितीकरीता 9175414355 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क करावा. 

यांना मिळणार लस

यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहितील गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणारे व्यक्ती, फ्लू रुग्णांची तपासणी, देखभाल आणि उपचारात सहभागी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचारी यांना इन्फल्युएंझा लस दिली जाईल. इन्फल्यूएन्झा लसीकरण हे ऐच्छिक व मोफत आहे. मनपाच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. ही लस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात इन्फल्यूएन्झा विरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास किमान दोन आठवड्याचा कालावधी लागतो. याप्रकारे मिळालेली प्रतिकारशक्ती एक वर्षापर्यंत टिकून राहू शकते. त्यामुळे हे लसीकरण दरवर्षी घेणे आवश्यक ठरते. 

लसीकरणानंतर या लक्षणांना घाबरु नका

लसीकरणामुळे काही जणांना ताप येणे, थकवा, ॲलर्जी, इंजेक्शनच्या जागी सूज येणे, अंग खाजविणे, डोकेदुखी, घाम येणे, स्नायू-सांध्यांमध्ये वेदना अथवा इतर प्रकारचा त्रास होउ शकतो. त्यामुळे अशा प्रतिक्रिया उद्भवल्यास लसीकरण घेतलेल्या लाभार्थ्यांनी घाबरून जाउ नये, असे आवाहनही मनपाद्वारे करण्यात येत आहे. 
 
स्वाईन फ्लू टाळण्याकरीता हे करा

 हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत.
 गर्दीमध्ये जाणे टाळा.
 स्वाईन फ्लू रुग्णापासून किमान ६ फूट दूर रहा. 
 खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा.
 भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी.
 पौष्टीक आहार घ्यावा.

हे करु नका

 हस्तांदोलन अथवा आलिंगन,
 सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
 डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे.

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget