एक्स्प्लोर

Nagpur Crime : नागपूर पोलिसांनी उतरवली तळीरामांची झिंग, 1.59 लाखांचा दंड वसूल; पार्टीत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीची छेड

एका पार्टीत केंद्रीय अर्धसैनिक दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी सोनेगाव पोलिसात गुन्हा दाखल केला असून शंकरनगर येथील विवेक सुभाष पांडे याला अटक केली आहे.

Nagpur Crime News : थर्टीफर्स्टची पार्टी साजरा करुन परत येणाऱ्या तळीरामांची झिंग नागपूर पोलिसांनी उतरवली असून मद्य प्राशन करुन वाहन चालवणाऱ्या 80 तळीरामांवर आणि मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Act) 1499 जणांवर वाहतूक पोलिसांनी (Nagpur Traffic Police) कारवाई करुन 1.59 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

तर अजनीत केंद्रीय विद्यालयाजवळ पहाटे 2.20 वाजताच्या सुमारास कार दुभाजकावर आदळून पलटी झाल्यामुळे कारचालक जखमी झाल्याची घटना घडली. कुणाल संजय देवतळे (वय 30 वर्षे, मनीषनगर) असे अपघातात जखमी झालेल्या कारचालकाचे नाव आहे. मेडिकल हॉस्पिटल मार्गावरील केंद्रीय विद्यालयाजवळ हा कारचालक आपली कारने (एम. एच. 34. ए. ए. 7272) जात असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार दुभाजकावर जाऊन आदळली आणि पलटली. 

पोलिसांकडून गुन्हा दाखल

यात कारचालक कुणाल जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच अजनी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी कारचालकाला शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेडिकल)मध्ये दाखल केले. तेथून नातेवाईक त्याला खासगी रुग्णालयात घेऊन गेल्याची माहिती अजनी पोलिसांनी दिली. संबंधित कारचालकाविरुद्ध पोलिसांनी भादंविच्या कलम 279, 336, 427 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पार्टीत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीची काढली छेड

नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्टीत केंद्रीय निमलष्करी दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी सोनेगाव पोलिसात (Nagpur Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शंकरनगर येथील विवेक सुभाष पांडे याला अटक केली आहे. केंद्रीय अर्धसैनिक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी ऑफिसर मेसमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या स्थानिक मित्रांनाही आमंत्रित केले होते. एका अधिकाऱ्याने पांडे यालाही पार्टीत बोलावले होते. या पार्टीत एका अधिकाऱ्याची 28 वर्षीय मुलगी देखील सहभागी झाली होती. मुलीने केलेल्या तक्रारीनुसार पांडे हा वारंवार तिला इशारे करत होता. तिने त्याच्याकडे दुर्लक्षही केले. पण रात्री 12 वाजता नववर्षाचा केक कापल्यानंतर पार्टीमध्ये सहभागी एकमेकांना शुभेच्छा देत होते. दरम्यान, पांडे तिच्याजवळ आला. तिचा हात पकडून तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने याची माहिती वडिलांना दिली. त्यांनी रविवारी सोनेगाव पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी छेड काढल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून, पांडेला अटक केली आहे. पांडे हा शेअर बाजाराचा व्यवसाय करतो.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

  • थर्टीफर्स्टची पार्टी करुन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील विविध भागांत पाठ्यांचे आयोजन करण्यात आले होते. या पाट्यांमध्ये वाहनचालक मद्य प्राशन करून वाहने चालवत असल्यामुळे शहर वाहतूक पोलिसांनी शहराच्या विविध भागांत तगडा बंदोबस्त लावला होता.
  • तरीदेखील 80 मद्यधुंद तळीराम वाहतूक पोलिसांच्या कारवाईत अडकले. मद्य प्राशन करुन वाहन चालवत असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तळीरामांना ताब्यात घेऊन वाहतूक शाखेत नेण्यात आले. तेथे फॉर्म भरुन त्यांच्या वाहनाचे कागदपत्र तपासण्यात आले. 
  • त्यानंतर ताब्यात घेतलेल्या तळीरामांच्या नातेवाईकांना बोलावून वाहन त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. कारवाई केलेल्या तळीरामांवर न्यायालयातून दंडात्मक कारवाई होणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
  • तर मोटार वाहन कायद्यांतर्गत विविध कलमांखाली 1499 वाहनचालकांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून 1 लाख 59 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला.

ही बातमी देखील वाचा...

नागपूरसाठी 2022मध्ये मिळालेले 'हे' प्रकल्प ठरणार 'गेमचेंजर'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
Embed widget