एक्स्प्लोर

स्वस्त धान्याच्या काळ्या बाजाराजाचा नागपूर पोलिसांकडून भांडाफोड, तब्बल 890 गोणी तांदूळ जप्त

नागपूरमधील दिघोरी परिसरातील एका गोदामातून सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीचा साठवणूक केलेला 890 गोणी तांदूळ नागपूर पोलिसांनी जप्त केला आहे.

नागपूर : शासनाकडून समाजातील गरीब कुटुंबासाठी दिल्या जाणाऱ्या धान्याच्या काळाबाजाराचा फांडाफोड नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) केला आहे. दिघोरी भागात एका गोदामातून पोलिसांनी छापा टाकून तब्ब्ल 890 गोणी तांदूळ जप्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याची काळ्या बाजारात विक्री गेल्या 8 महिन्यांपासून सुरु असल्याचे समोर आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघोरी परिसरातील एका गोदामात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीचा तांदूळ साठवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे आज पहाटे 4 च्या सुमारास पोलिसांनी गोदामावर छापा टाकला. यावेळी गोदामात 445 क्विंटल तांदूळ साठवल्याचे आढळून आले. पोलिसांनी गोदाम भाड्यावर घेणाऱ्या  अमोल लांबाडे आणि कासीम नामक व्यक्तीसह एकाला ताब्यात घेतले. 

गोदामात सापडलेला तांदूळ रेशन व्यवस्थेतील असून कोरोना काळात राज्य आणि केंद्र सरकारकडून अंत्योदय आणि प्राधान्य गट श्रेणीतील कुटुंबाना 2 रुपये किलो दराने देण्यात येत होता. हाच तांदूळ वाड्या वस्त्यांमध्ये फिरून लोकांकडून 8 ते 10 रुपये प्रति किलो दराने खरेदी केला जात होता. पुढे हा तांदूळ गोंदिया जिल्ह्यातील एका राईस मिलमून पॉलिश करून घेतला जात असे.  यावेळी त्यात काही प्रमाणात चांगल्या तांदळाची मिसळ करून नंतर तो तांदूळ मोठ्या मॉलमध्ये 17 ते 20 रुपये किलो दराने विकण्यासाठी पाठवला जात असे, अशी माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. 

याबरोबरच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये येणाऱ्या ट्रक्समधील धान्य तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोरले जाते असेही समोर आले आहे. या टोळीने आतापर्यंत हजारो क्विंटल तांदळाची असाच काळाबाजार करत विक्री केली आहे. पोलिसांनी छापा टाकलेल्या गोदामातून महाराष्ट्र शासनाचा शिक्का असलेल्या गोण्यांसह पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकारच्या रेशन व्यवस्थेतील रिकाम्या गोण्याही  मिळाल्या आहेत.  

महत्वाची माहिती 

             

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! नागपुरातून तब्बल दीड कोटी रुपयांची इलेक्ट्रिक बस चोरीला, अमरावतीत चोरट्याला पकडले, आत्तापर्यंत 20 बस चोरल्याची कबुली 
धक्कादायक! नागपुरातून तब्बल दीड कोटी रुपयांची इलेक्ट्रिक बस चोरीला, अमरावतीत चोरट्याला पकडले, आत्तापर्यंत 20 बस चोरल्याची कबुली 
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
Nagpur Congress : विश्वास नांगरे पाटील यांना नागपूर काँग्रेससह विरोधी पक्षांकडून संविधानाची प्रत भेट; म्हणे, 'संघ समजून घ्यायचे असेल, तर....
विश्वास नांगरे पाटील यांना नागपूर काँग्रेससह विरोधी पक्षांकडून संविधानाची प्रत भेट; म्हणे, 'संघ समजून घ्यायचे असेल, तर....

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget