एक्स्प्लोर

Nagpur Crime : दोन वर्षांपूर्वी नागपुरातून अपहरण केलेल्या अल्पवयीन तरुणीची तेलंगणातून सुटका; अत्याचार झाल्याचा आरोप, बाळाला दिला जन्म, आरोपी अटकेत

बेशुद्धावस्थेत असतानाच आकाशने तिच्यावर अत्याचार केला. तो सतत तिच्याशी जबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित करीत होता. तसेच तिला जबर मारहाण करीत असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली.

Nagpur Crime News : नागपुरात एक धक्कादायक (Nagpur News Updates) प्रकार समोर आला आहे.  दोन वर्षांपूर्वी अपहरण केलेल्या एका अल्पवयीन मुलीची सुटका आता करण्यात आली आहे. या दोन वर्षात तिच्यावर अत्याचार करण्यात आले, यातून तिनं एका बाळाला देखील जन्म दिला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीनं दोन वर्षांपूर्वी खाण्यात गुंगीचे औषध देत एका 16 वर्षीय मुलीचे अपहरण करून तेलंगणाला नेलं. तिथं एका फार्महाऊसवर कोंडून ठेवत सतत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सततच्या अत्याचाराने तिला गर्भधारणा झाली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. दरम्यान या अपहृत मुलीचा शोध लावण्यात मानवी तस्करी विरोधी पथकाला दोन वर्षांनी यश आले आहे. मुलीला तिच्या बाळासह ताब्यात घेऊन अपहरण केलेल्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आकाश ओमप्रकाश गुल्हाणे (23) रा. खम्मम, तेलंगणा असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कल्पना (काल्पनिक नाव) नागपुरात राहायची. तिचे आईवडील मोलमजुरी करतात. 2019 मध्ये ती 12 व्या वर्गात शिकत होती. त्यावेळी तिच्या घराशेजारी आरोपी आकाश राहायला आला. तो मूळचा तेलंगणा राज्यातील खम्ममचा असून काम करण्यासाठी नागपुरात आला होता. शेजारी असल्यामुळे त्यांची तोंडओळख होती. नंतर एकमेकांशी बोलायला लागले, दोघांत मैत्री झाली. आकाशचे तिच्यावर एकतर्फी प्रेम जडले. मात्र, तिने त्याला स्पष्ट नकार दिला. मात्र, आकाश तिचा पिच्छा सोडत नव्हता. त्याने तिला 31 मार्च 2019 ला तासाभरासाठी फिरायला जायचे असल्याचे सांगून दुचाकीवर बसवले. सायंकाळच्या सुमारास त्याने खाण्याच्या पदार्थात गुंगीचे औषधी टाकून तिला थेट तेलंगणात नेले. गावापासून दूर असलेल्या एका शेतातील घरात कोंडून ठेवले. या दरम्यान तो तिच्याशी जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करत राहिला. दुसरीकडे मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने आईवडिलांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

शेतातील घरात ठेवले कोंडून

आकाशने कल्पनाला शेतातील घरात कोंडून ठेवले होते. बेशुद्धावस्थेत असतानाच आकाशने तिच्यावर अत्याचार केला. तेव्हापासून तो सतत तिच्याशी जबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित करीत होता. तिने घरी नेऊन सोडण्याबाबत विचारणा केल्यास आकाश जबर मारहाण करीत होता. त्यामुळे भीतीपोटी ती गप्प होती. दरम्यान सततच्या लैंगिक अत्याचारातून तिला गर्भधारणा झाली आणि तिने 11 दिवसांपूर्वीच एका बाळाला जन्म दिला.

असा लागला सुगावा

दरम्यान मुलीचे अपहरण करून तेलंगणाकडे नेल्याची माहिती मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक रेखा संकपाळ यांना मिळाली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात एपीआय संकपाळ, हवालदार राजेंद्र अटकाळे, ज्ञानेश्वर टोके, सुनील वाकडे, शरीफ शेख, ऋषीकेश डुंबरे आणि पल्लवी वंजारी यांनी तेलंगणा राज्यात शोध घेतला. आकाशला अटक केली. कल्पनाला 11 दिवसांच्या बाळासह ताब्यात घेऊन आईवडिलांच्या स्वाधिन करण्यात आले. तिने आकाशने केलेल्या लैंगिक अत्याचाराच पाढा वाचला, त्यामुळे पोलिसांच्याही अंगावर काटा आला.

ही बातमी देखील वाचा...

पालकांनी सोडून दिलेल्या चिमुकलीला तृतीयपंथीयांची साथ; पोलीस उपायुक्तांनी स्वीकारली परीच्या शिक्षणाची जबाबदारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया कशी असेल?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Embed widget