एक्स्प्लोर

नागपूर पोलिसांनी लावले तडीपार गुंडांचे होर्डिंग्स

क्राईम कॅपिटल अशी ओळख निर्माण झालेल्या नागपुरात तडीपार (हद्दपार) गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक विशेष मोहीम आखली आहे.

नागपूर : क्राईम कॅपिटल अशी ओळख निर्माण झालेल्या नागपुरात तडीपार (हद्दपार) गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक विशेष मोहीम आखली आहे. पोलिसांच्या या मोहिमेमुळे आता तडीपार गुंड शहरातील चौका-चौकांवर झळकू लागले आहे दादा, काका, मामा, भाई अशी भारदस्त नावे लावून शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने चौका-चौकात होर्डिंग लावून कुख्यात गुंड परिसरात आपली दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आता अशाच गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी होर्डिंग वॉर सुरु केले आहे. ज्या गुन्हेगारांना नागपूर शहरातून तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहे, अशा गुन्हेगारांचे मोठे फलक शहरातील अनेक चौकात लावण्यास नागपूर पोलिसांनी सुरवात केली आहे. या फलकांवर तडीपार गुंडाच्या फोटोंसह त्यांच्या गुन्ह्यांची माहिती, त्यांच्या हद्दपारीचे ठिकाण आणि हद्दपारीचा कालावधी अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. हद्दपारीच्या काळात जर संबंधित गुन्हेगार नागपूर शहरात दिसला तर फलकांवर दिलेल्या पोलिसांच्या फोन नंबरवर माहिती देण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. नागपुरात हद्दपारीचा आदेश असतानाही अनेक गुन्हेगार शहरात मोकाट फिरत असतात आणि रात्रीच्या वेळी अनेक गंभीर गुन्हे करतात. खंडणी, मारहाण, धमकी, खून किंवा खुनाचा प्रयत्न अशा अनेक घटनांमध्ये यापूर्वी तडीपार गुन्हेगार सहभागी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे यावेळी थेट अशा हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची संपूर्ण कुंडलीच पोलिसांनी जनतेसमोर ठेवली आहे. नागपूर पोलिसांनी या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला नागपूरच्या मानकापूर परिसरातून सुरुवात केली आहे. आज सकाळपासून या परिसरात गुन्हेगारांचे होर्डिंग लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. नागपूर शहरातून आजच्या घडीला 600 ते 700 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. त्यापैकी टॉप 50 गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांचे जाहीर फलक संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत लावण्याचे कार्य सुरु झाले आहे. ज्या फलकांचा व होर्डिंगचा वापर करून गुन्हेगार नागरिकांत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत होते, आता त्याच माध्यमाचा वापर करुन पोलीस नागरिकांमधील गुन्हेगारांची दहशत कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, यामुळे तडीपार गुन्हेगारांची माहिती पोलिसांना मिळवणे शक्य झाले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget