(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जीवघेण्या पतंगबाजीवर नागपूर पोलिसांची नजर, 12 ठिकाणी धडक छापे घालत कारवाई
Nylon Manja : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या झोन तीनच्या पथकाने शहरातील 12 ठिकाणी छापे घालून 400 चक्री नायलॉन मांजा आणि आठ हजार प्लॅस्टिकच्या पतंग जप्त केल्या आहेत.
नागपूर : जसं जसं मकर संक्रांतीचे पर्व जवळ येत आहे, तसं तसं नागपुरात पतंगबाजीचा जोर वाढत आहे. मात्र, या पतंगबाजीमुळे अनेकांचा जीव ही धोक्यात येत आहे. कारण अनेक ठिकाणी बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर पतंगबाजी मध्ये होत आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या झोन तीनच्या पथकाने शहरातील 12 ठिकाणी छापे घालून 400 चक्री नायलॉन मांजा आणि आठ हजार प्लॅस्टिकच्या पतंग जप्त केल्या आहेत.
नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या झोन तीनच्या पथकाने शहरातील 12 ठिकाणी छापे घालून 400 चक्री नायलॉन मांजा आणि आठ हजार प्लॅस्टिकच्या पतंग जप्त केल्या आहे. भंडारा आणि नाशिक मधून बंदी असलेला नायलॉन मांजा नागपुरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या एक पथकाने भंडारा आणि नाशिक मधून दोघांना ताब्यात घेतले होते.
पकडलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारावर नागपुरात कळमना, यशोधरानगर, सक्करदरा, पाचपावली, गणेशपेठ, वाठोडा, नंदनवन, तहसील, कोतवाली आणि धंतोली भागात १२ ठिकाणी छापे घालून मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजा आणि पतंग जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणी नागपुरातून ही काही पतंग विक्रेत्यांना नायलॉन मांजा विक्री प्रकरणी अटक करण्यात आले आहे.
बंदी असून ही सर्रास विकला जाणारा नायलॉन मांजा अनेकांसाठी जीवघेणा ठरत आहे. नागपुरात नायलॉन मांजा आणि रस्त्याच्या कडेला केल्या जाणाऱ्या धोकादायक पतंगबाजीमुळे अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलीस नायलॉन मांजा विरोधात भक्कम कारवाई करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Covid 19 3rd Wave : तिसरी लाट धडकली? जानेवारीच्या अखेरीस दिवसागणिक 10 लाख रुग्ण?
- चिंताजनक! कोविड झालेल्या लहान मुलांना मधुमेह होण्याचा धोका अडीच पट अधिक : सीडीसी
- Pakistan Heavy Snowfall : पाकिस्तानात जोरदार बर्फवृष्टीमुळे 21 लोकांचा मृत्यू, अनेक पर्यटक अडकले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha