![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nagpur News : पुरुषांची मक्तेदारी असलेल्या मायनिंग क्षेत्रात आता मराठी मुली, नागपुरातील चार विद्यार्थिनींना चांगल्या नोकरीची ऑफर
Girls In Minning Sector: सध्याच्या आधुनिक काळात मुली प्रत्येक क्षेत्रात उंच झेप घेत आहेत. त्यातच नागपुरात मायनिंग क्षेत्रात आता मुलींनी पदार्पण केले आहे.
![Nagpur News : पुरुषांची मक्तेदारी असलेल्या मायनिंग क्षेत्रात आता मराठी मुली, नागपुरातील चार विद्यार्थिनींना चांगल्या नोकरीची ऑफर Nagpur girls in minning sector also got the job opportunity detail marathi news Nagpur News : पुरुषांची मक्तेदारी असलेल्या मायनिंग क्षेत्रात आता मराठी मुली, नागपुरातील चार विद्यार्थिनींना चांगल्या नोकरीची ऑफर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/76549805e374fb2ea82a0a397276edd71682241354489720_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Girls In Minning Sector: पुरुषांची(male) मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या मायनिंग (Mining) क्षेत्रात आता मराठी मुली त्यांचे कौशल्य दाखवणार आहेत. नागपूरच्या (Nagpur) शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयातील चार विद्यार्थिनींना मल्टिनॅशनल कंपनीमध्ये संधी देखील मिळाली आहे.
चार विद्यार्थिनींना मल्टिनॅशनल कंपनीत संधी
नागपूरच्या शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयातून डिप्लोमा इन मायनिंगच्या पहिल्याच बॅचच्या विद्यार्थिनींना चांगल्या नोकरीची ऑफर आली आहे. "डिप्लोमा इन मायनिंग"चे अभ्यासक्रम पूर्ण करताना मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरीचे नवे दालन खुले झाले असून चांगले वेतनही या मुलींना मिळाले आहे. त्यामुळे आजवर पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या मायनिंग सेक्टरमध्ये आता मराठी मुली आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाल्या आहे.
'खडतर आव्हान पेलण्यासाठी आम्ही सज्ज'
मायनिंगमध्ये डिप्लोमा करणाऱ्या या राज्यातील पहिल्याच चार तरुणी आहेत. खरंतर या सर्व तरुणींची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची आहे. कोणाचे वडील चौकीदारी करतात तर कोणाचे वडील गॅस रिपेअरिंगचे काम करतात. त्यामुळे डिप्लोमा कोर्सनंतर इतक्या लगेच संधी मिळाल्याने सर्व तरुणींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे. 2020 पासून नागपूरच्या शासकीय पॉलिटेक्निकमध्ये मुलींसाठी मायनिंगच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आली. मुलींसाठी डिप्लोमा इन मायनिंगचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग होता आणि पहिल्याच बॅचला मिळालेली ही संधी पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. मायनिंग क्षेत्रातील खडतर आव्हानं पेलण्यासाठी आम्ही सज्ज असल्याची भावना या सर्व विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
विद्यार्थिनी, पालक आणि शिक्षकांच्या भावना...
ही फार आनंदाची बाब असून आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट असल्याची भावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज डायगव्हाणे यांनी व्यक्त केली आहे. मायनिंगचे दालन 1920 साली भारतात खुले झाले आणि आता मुलींना देखील ही संधी मिळतेय. त्यामुळे मुली आता नक्कीच पुढे जाऊ शकतील असं देखील मत प्राचार्यांनी मांडलं. तसेच ही संधी ज्या मुलींना मिळाली, त्या मुलींनाही आपला आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी पालक आणि शिक्षकांचे आभार मानत स्वत:ला फार नशिबवान समजतो असं म्हटलं आहे. आता नोकरीची देखील संधी मिळाल्याने घराचीसुद्धा जबाबदारी घेणार असल्याचं या मुलींनी सांगितलं. तसेच मुलींच्या आनंदात मनापासून सामील होत असल्याचं पालकांनी यावेळी सांगितलं.
मायनिंग म्हणजे नक्की काय?
मायनिंग म्हणजे खाण अभियांत्रिकी शाखा. या शाखेत तंत्रज्ञान, विज्ञान आणि नैसर्गिक वातावरणातून खनिजे काढली जातात. त्यावर प्रक्रिया देखील केली जाते. भारतात, या शाखेच्या अभ्यासक्रमामध्ये प्रक्रिया आणि वापरासाठी मौल्यवान धातू काढले जातात.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)