एक्स्प्लोर

Nagpur Crime : नागपुरात पूर्ववैमनस्यातून भरदिवसा एकाला संपवलं, दोन मारेकऱ्यांना पोलिसांकडून अटक

Nagpur Crime : धारदार शस्त्राने वार करुन दोन तरुणांनी एका वृद्ध व्यक्तीचा खून केला. ही घटना भरदिवसा सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारत माता चौकात घडली.

Nagpur Crime News : धारदार शस्त्राने वार करुन दोन तरुणांनी एका वृद्ध व्यक्तीचा खून केला. ही घटना भरदिवसा सक्करदरा पोलीस (Nagpur Police) ठाण्याच्या हद्दीत भारत माता चौकात घडली. पूर्ववैमनस्यातून घडलेल्या या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. मोहम्मद शाकिब सारिक अंसारी (वय 19 वर्षे) रा. महेंद्रनगर आणि शेख फैज शेख फिरोज (वय 18 वर्षे) रा. यासीन प्लॉट, मोठ ताजबाग अशी आरोपींची नावे आहे. तर शेख फिरोज शेख मोइनुद्दीन (वय 50 वर्षे) रा. यासीन प्लॉट, मोठा ताजबाग असे मृताचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिरोज आणि त्याच्या भावांचे आशीर्वादनगर येथील भारत माता चौकाजवळ पानठेला आहेत. त्यांच्यावर पूर्वीचे काही गुन्हे नोंद असल्याची चर्चा आहे. मोठा ताजबाग परिसरातच राहणाऱ्या आसिफ घोडाशी या शेख बंधूंचे अनेक वर्षांपासून वैमनस्य आहे. जवळपास सहा महिन्यांपूर्वी फिरोजचा लहान भाऊ शेख फारुखने ताजबागच्या समोसा मैदानाजवळ आसिफवर हल्ला केला होता. या प्रकरणात त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पाचपावलीच्या वैशालीनगर सिमेंट रोडवर दिवसाढवळ्या एका युवकाचा खून करण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. गेल्या सात दिवसांत शहरात चार खुनाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्येही दहशतीचे वातावरण आहे.

पंधरा दिवसांपूर्वीच व्यसनमुक्ती केंद्रातून परतला

फिरोजला अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे व्यसन आहे. हे व्यसन सोडवण्यासाठी त्याला व्यसनमुक्ती केंद्रातही भरती करण्यात आले होते. पंधरा दिवसांपूर्वीच तो व्यसनमुक्ती केंद्रातून घरी आला होता. मंगळवारी (3 जानेवारी) दुपारी फिरोज त्याच्या दुकानाजवळील दुकानदाराकडे चप्पल दुरुस्त करण्यासाठी गेला होता. या दरम्यान शाकिब आणि फैज तेथे आले. दोघांनीही धारदार शस्त्रांनी फिरोजवर हल्ला केला. फिरोज रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. त्याचे भाऊ मदतीला पोहोचण्यापूर्वीच आरोपी दुचाकीवर बसून पसार झाले होते. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. 

दोघांना कामठीतून अटक

फिरोजला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्यासह सक्करदरा आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळावर पोहोचले. दोन्ही आरोपी सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये कैद झाले होते. सक्करदरा ठाण्याच्या डीबी पथकाने दोघांनाही कामठी परिसरातून अटक केली. चौकशीत शाकिबने सांगितले की, सहा महिन्यांपूर्वी फारुखने त्याचा मामा आसिफ घोडावर जीवघेणा हल्ला केला होता. याचा बदला घेण्यासाठी त्याने फिरोजवर हल्ला केला.

ही बातमी देखील वाचा...

वेकोलीच्या अधिकाऱ्याच्या घर-कार्यालयावर सीबीआयच्या धाडी; आतापर्यंत 67 लाखांची अतिरिक्त मालमत्ता उघड!

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget