(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
Nagpur Accident : उपराजधानी नागपूर भीषण अपघातानं हादरली आहे. नागपूर कामठी मार्गावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला.
नागपूर : राज्याची उपराजधानी भीषण अपघातानं हादरली आहे.नागपूर (Nagpur) - कामठी मार्गावर ट्रॅव्हल्स आणि ऑटो रिक्षाचा (Private Bus Auto Rickshaw Accident) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ऑटो रिक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. अपघातग्रस्त रिक्षातून सैन्यदलाचे जवान प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे. सैन्यदलाचे जवान रिक्षातून कामठी येथील कंटोन्मेंटकडे जात होते, अशी माहिती समोर आली आहे. या रिक्षातून प्रवास करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर इतर प्रवासी जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी आहे, अपघातग्रस्त ऑटो रिक्षामध्ये सैन्याचे जवान प्रवास करत होते. ते कामठी येथील कंटोन्मेंट कडे जात होते अशी माहिती मिळाली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे, तर ऑटो रिक्षा मध्ये बसलेले इतर 6 ते 7 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातातील जखमींना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात ज्या दोघांचा मृत्यू झाला ते सैन्यदलाचे जवान असल्याची माहिती मिळाली आहे. या रिक्षातून प्रवास करणारे इतर सहा जवान आणि ऑटोचालक जखमी असल्याची मिळाली आहे. हा अपघात नागपूर जिल्ह्यातील कामठी आणि कन्हान दरम्यान कन्हान नदीच्या पुलावर झालाय. पुलावरच खासगी बसने ऑटो ला धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु
खासगी बस आणि ऑटो रिक्षाचा अपघात इतक्या जोरात झाला की रिक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. रिक्षातून कामठी कंटोन्मेंटकडे जाणाऱ्या सैन्य दलाच्या जवानांपैकी दोघांना जीव गमवावा लागला आहे. या अपघातातील इतर जखमींवर नागपूरमधील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींना इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय, शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि कामठी येथील एक खाजगी रुग्णालय अशा तीन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
घटनास्थळी मोठी गर्दी
खासगी बस आणि ऑटो रिक्षाचा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. स्थानिकांनी आणि इतर वाहनधारकांनी घटनास्थळी बचाव कार्य राबवलं. रिक्षाचं या अपघातात मोठं नुकसान झालं. तर, या रिक्षातून प्रवास करणाऱ्या सैन्य दलाच्या दोन जवानांचा मृत्यू झाला. ही घटना कन्हान नदीच्या पुलावर घडली.
संबंधित बातम्या :