नागपुरातील टेकडी गणपती मंदिरात निर्माल्यापासून सुगंधित धूप कांडी, महिलांना मिळाला हक्काचा रोजगार
नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या हार फुलांच्या निर्माल्यापासून सुगंधित धूप कांडी तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
नागपूर: आपणचं देवाला वाहिलेल्या फुलांचा सुगंध पुढे धूपकांडीच्या स्वरूपात आपल्या घरातील देव्हाऱ्यात दरवळणार असेल तर.. तुम्हाला प्रश्न पडला असेल ते कसं?.. कोणत्याही मंदिरात भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं देवाला अर्पण केलेल्या हार आणि फुलांचे नंतर नेमकं काय होतं??? अनेक ठिकाणी भाविकांनी अर्पण केलेल्या हार फुलाचे निर्माल्य कचऱ्यात फेकले जाते. मात्र, नागपुरातील (Nagpur News) प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या हार फुलांच्या निर्माल्यापासून सुगंधित धूप कांडी तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सध्या रोज गोळा होणाऱ्या निर्माल्यापासून सुमारे 25 किलो धुपकांडी तयार केली जात आहे..
नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या हार फुलांच्या निर्माल्यापासून सुगंधित धूप कांडी तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आधी मंदिरात अर्पण करण्यात आलेल्या हार फुलांना सुकवले जाते. त्यात पंचगव्य मिसळले जाते आणि नंतर मशीनचा मदतीने धूप कांडी तयार केली जाते. सध्या रोज गोळा होणाऱ्या निर्माल्यापासून सुमारे 25 किलो धुपकांडी तयार केली जात आहे.
हजारो किलो हार, फुलांचा प्रश्न मार्गी लागला
महत्वाचे म्हणजे आपणचं देवाला वाहिलेल्या फुलांचा सुगंध पुढे धूपकांडीच्या स्वरूपात आपल्या घरातील देव्हाऱ्यात दरवळणार आहे, हे समजल्यानंतर भाविक देखील मोठ्या प्रमाणात मंदिरातून धूपकांड्या विकत घेऊ लागले आहेत. या उपक्रमामुळे मंदिराकडून अनेक महिलांना रोजगार मिळालाच आहे. शिवाय रोज गोळा होणाऱ्या हजारो किलो हार, फुलांचा प्रश्न देखील मार्गी तर लागला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या उपक्रमामुळे भाविकांच्या श्रद्धेचा देखील मान राखला गेला आहे.
टेकडी गणपती मंदिर ट्रस्टचे सचिव श्रीराम कुलकर्णी म्हणाले, दहा दिवस देवाच्या चरणी भक्तिभावाने वाहिलेल्या त्या फुलांचं काय करायचं, हा प्रश्न निर्माण होतो. वाहत्या पाण्यात ते सोडणं हा एक पर्याय असू शकतो, पण त्यामुळे जलप्रदूषणात वाढ होते.गणेशोत्सवात तयार होणारे निर्माल्य एकत्र केले. सुरूवातीला वर्ध्याला यंत्र असल्याची माहिती मिळाली. तिथे आमचे सहकारी गेले वर्ध्याहून एक यंत्र आणले. सुरूवातीला फुल गोळा केली ती वाळवली. त्यानंतर त्यामध्ये गायीचे शेण, सुंगंधी द्रव्ये वापरली आणि धुपकांडी बनवली. ना नफा ना तोटा या तत्त्वावर हा उपक्रम सुरू केला. सणांच्या दिवशी येणारी फुले ही खते बनवण्यासाठी येतो. तसेच गुलाबाचा सुंगध असलेल्या अगबत्तीला खूप मागणी आहे. सध्या दिवसाला 100 ते 150 पाकिटांची विक्री होत आहे.
हे ही वाचा :
Ganesh Visarjan 2023: 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गणपतीचे विसर्जन का करतात? पौराणिक कथा जाणून घ्या